मीटर बंद असूनही साडेसतरा हजार बिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीटर बंद असूनही
साडेसतरा हजार बिल
मीटर बंद असूनही साडेसतरा हजार बिल

मीटर बंद असूनही साडेसतरा हजार बिल

sakal_logo
By

04447
पडवळ यांना दिलेले साडेसतरा हजाराचे वीज बिल.

वीज मीटर बंद असूनही
साडेसतरा हजार बिल

नांगरतास येथे महावितरणचा कारभार

सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. २३ : नांगरतास येथील ग्राहक तुकाराम पडवळ यांना वीज मीटर बंद असूनही साडेसतरा हजार बिल आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत जाब विचारण्यास गेले असता त्यांना माडखोल येथील वीज अधिकाऱ्याकडून समर्पक उत्तर मिळाले नसल्याने महावितरणच्या या भोंगळ कारभाराबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. संबंधित वीज अधिकाऱ्याला तात्काळ हटवून सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशाराही पडवळ यांनी दिला आहे.
पडवळ यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘महावितरणने त्यांना एक महिन्याचे १७,७५० रुपयांचे घरगुती बिल दिले आहे. गेल्या महिन्यात त्यांनी ३९० रुपये बिल भरले होते, तेव्हा युनिट २१,०१३ होते. या महिन्यात २१,०६९ युनिट दाखविले. मीटर बंद असल्याने नवीन मीटर बसविण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मीटर बंद असताना अंदाजे ४६ युनिट दाखवून १७,७५० रुपयांचे बिल दिले. यासंबंधी माडखोल येथील महावितरण केंद्रातील अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. याबाबत संताप व्यक्त करत जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा इशारा पडवळ यांनी दिला आहे.