कोलगाव-चव्हाणवाडी रस्ताकामाचे भूमिपूजन

कोलगाव-चव्हाणवाडी
रस्ताकामाचे भूमिपूजन

04448
कोलगाव ः येथे रस्ताकामाचे भूमिपूजन करताना महेश सारंग. शेजारी सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग आदी.

कोलगाव-चव्हाणवाडी
रस्ताकामाचे भूमिपूजन
सावंतवाडी, ता. २३ ः कोलगाव-चव्हाणवाडी येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आज भाजप नेते जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्या हस्ते झाले. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या शिफारशीनुसार २५-१५ योजनेतून या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. याप्रसंगी १५ वर्षे जमिनीच्या वादात अडकलेला प्रश्न निकाली काढत वचन पूर्तता केल्याबद्दल कोलगाव सोसायटीचे संचालक बाबूराव चव्हाण यांचा सारंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, माजी सरपंच राजन कुडतरकर, सार्वजनिक बांधकाम अभियंता विजय चव्हाण, माजी सरपंच राजन कुडतरकर, भाजप बुथ अध्यक्ष सुरेश दळवी, जयानंद म्हापसेकर आदींचे सागर चव्हाण यांनी स्वागत केले. सरपंच राऊळ, बाबूराव चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. सारंग यांनी जनतेत राहून जनतेसाठी काम करणाऱ्या भाजपसोबत राहावे. लोकसभेत भाजपचा उमेदवार विजयी करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन केले. मधुकर चव्हाण, बबन कोलगावकर, गोपाळ उर्फ दाजी चव्हाण, दीपक चव्हाण, कृष्णा चव्हाण, राजकुमार चव्हाण, रवी चव्हाण, अॅड. परशुराम चव्हाण, आनंद चव्हाण, भरत चव्हाण, बबिता चव्हाण, तारामती चव्हाण, नर्मदा चव्हाण, विजया चव्हाण, रेषा चव्हाण, गौरी चव्हाण, संध्या चव्हाण, गौरी चव्हाण-कुटे, संदेश चिकोटीकर, संजोग जाधव, राजेश पाटील, शंकर गोंडयाळकर, परशुराम गोंडयाळकर, गुरुप्रसाद सावंत उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com