कुडाळ पं. समितीत आज प्रशासकीय संस्कार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ पं. समितीत आज 
प्रशासकीय संस्कार शिबिर
कुडाळ पं. समितीत आज प्रशासकीय संस्कार शिबिर

कुडाळ पं. समितीत आज प्रशासकीय संस्कार शिबिर

sakal_logo
By

कुडाळ पं. समितीत आज
प्रशासकीय संस्कार शिबिर
कुडाळ, ता. २३ ः येथील पंचायत समितीतर्फे जिल्ह्यात प्रथमच सर्वसामान्यांपासून सर्वच घटकातील लोकांची कामे, त्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सकारात्मक पद्धतीने सुटले पाहिजेत, या अनुषंगाने सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी उद्या (ता. २४) सकाळी दहाला प्रशासकीय संस्कार शिबिराचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात केले आहे. प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी ही माहिती दिली.
गटविकास अधिकारी चव्हाण म्हणाले, ‘‘पंचायत समितीच्या शिपाईपासून ते सर्व अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सकारात्मक दृष्टिकोनातून सुटावेत, या अनुषंगाने या आगळ्यावेगळ्या प्रशासकीय संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. सर्वसामान्यांना योग्य न्याय मिळावा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, हा या मागचा उद्धेश आहे. या संस्कार शिबिरामध्ये टिप्पणी, लेखन, सर्व प्रकारचे कार्यालयीन पत्रव्यवहार, अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, कार्यालयीन शिस्त व शिष्टाचार, पर्यवेक्षकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य, कामकाज, माहितीचा अधिकार, अधिनियम मुद्दे पूर्तता, कामकाज परीक्षण खाते प्रमुख तपासणी लेखाविषयक सर्व कामकाज, खरेदी प्रक्रिया कॅशबुक-पेटीकॅशबुक जमा खर्च रजिस्टर सर्व प्रकारची देयके तयार करणे, आरोग्याची काळजी तसेच योगा व्यायामाचे जीवनातील महत्त्व, गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाईन फसवणू याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली