-कसबा येथील संभाजी स्मारकाचा मार्ग मोकळा

-कसबा येथील संभाजी स्मारकाचा मार्ग मोकळा

१० (टुडे पान १ साठी)

कसब्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या
स्मारकाचा मार्ग मोकळा

नियोजनासाठी लवकरच बैठक; ''स्फूर्ती पर्यटन'' पर्यटनाचे नवे दालन

रत्नागिरी, ता. २३ : कसबा (ता. संगमेश्वर) येथे नियोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाची पुढील पिढ्यांना कायमस्वरूपी ओळख रहावी यासाठी आणि ''स्फूर्ती पर्यटन'' हे पर्यटनाचे नवे दालन कोकणात उघडून देण्यासाठी या स्मारकाचा उपयोग होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने विचारविनिमय आणि पुढील चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यासंदर्भात मागणी करणारे पत्र जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहे.
स्थानिकांना रोजगारासह इतिहासाचे पुनरुज्जीवन या निमित्ताने होणार असल्याने लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी कसबा संगमेश्वर येथे छत्रपती श्री संभाजी महाराजांचे स्मारक होण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सविस्तर योजना मांडून तशी मागणी केली होती. ''स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईज'' (बलिदान स्मारक) असे त्या स्मारकाचे नावही त्यांनीच सुचविले आहे. धर्मरक्षणासाठी, स्वधर्म न त्यागता अत्यंत हाल सोसून बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे सतत स्मरण रहावे, या साठी १०० एकर परिसरात हे स्मारक उभारण्याची योजना प्रमोद जठारांनी सादर केली होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला त्यासाठी १० कोटीचा निधी मंजूर केला होता. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने विचारविनिमय आणि पुढील चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्माचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यासंदर्भात मागणी करणारे पत्र जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे. यामुळे कसबा संगमेश्वर येथे नियोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाची पुढील पिढ्यांना कायमस्वरूपी ओळख रहावी यासाठी आणि ''स्फूर्ती पर्यटन'' हे पर्यटनाचे नवे दालन कोकणात उघडून देण्यासाठी या स्मारकाचा उपयोग होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com