-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त
-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त

sakal_logo
By

१६ (टुडे पान १ साठी, संक्षिप्त)

चार बसस्थानकाच्या कामाची पाहणी

रत्नागिरी : चिपळूण, लांजा, पाली आणि रत्नागिरी या चार ठिकाणच्या हायटेक बसस्थानकाची कामाची पाहणी करण्यासाठी एसटी महामंडळाचे इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी शुक्रवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी या चारही बसस्थानक बांधकाम कामाचा आढावा घेतला असून हे काम लवकरात लवकर प्रगतीपथावर जावे यासाठी सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी मुख्य बसस्थानकाचे काम संथगतीने सुरू आहे. ठेकेदारांना कामाचे बजेट वाढवून हवे होते. ही मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री यांच्याकडे ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री यांनी याला मंजुरी दिल्याने बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, ज्या पद्धतीने काम होणं आवश्यक आहे. त्यापद्धतीने काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयामधून इंजिनिअरिंग विभागाचे अधिकारी बसस्थानक कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीत आले होते. पाली, लांजा, चिपळूण यासह रत्नागिरी बस स्थानकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली.
--
लांजा-साटवली मार्गावर नागरिक टाकताहेत कचरा

लांजा ः लांजा-साटवली मार्गावर भटवाडी येथील एका शाळेनजीक असलेल्या मोरीत काही नागरिकांकडून कचरा व घाण आणून टाकली जाते. त्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. यावर नगरपंचायतीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लांजा साटवली हा कायम वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याने पहाटे तसे सायंकाळच्या वेळी चालण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भटवाडी शाळेजवळ असलेल्या मोरीत काही नागरीकांकडून कचरा टाकला जातो. काही चिकन विक्रेत्यांकडूनही चिकन साफ केल्यानंतरची घाण तेथेच टाकली जाते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी नागरिकांना नाकावर रुमाल घेऊन ये-जा करावी लागते. इतकी दुर्गंधी या ठिकाणी पसरली आहे. या ठिकाणी कचरा टाकू नये, नगरपंचायतीमार्फत कचरा टाकणाऱ्याला ५०० रुपये दंड केला जाईल असा फलक लावण्यात आला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून लोकांकडून या ठिकाणी कचरा, घाण टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
--

लांजा आगारातून चार जादा गाड्या

लांजा ः मे महिन्याची सुट्टीत गावागावात आलेले मुंबईकर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागणार आहेत. यासाठी लांजा एसटी आगार सज्ज झाले आहे. २५ मे पर्यंत मुंबई, बोरिवली, कल्याण मार्गावर दररोज चार जादा फेऱ्या सोडल्या जात आहेत. चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी लांजा एसटी आगाराने गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी गावागावातून मुंबईला परतीच्या प्रवासासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक मे पासूनच आगारातून जादा जागा गाड्या सोडण्यात येत आहेत. यामध्ये लांजा बोरिवली १, लांजा मुंबई १, लांजा कल्याण १, काजीर्डा बोरिवली १ या मार्गांवर जादा एसटी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. २५ मे पर्यंत दररोजच्या चारही जादा फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. जादा गाड्यांबरोबरच नियमित लांजा बोरिवली ही बस सोडण्यात येत आहे. या गाड्यांचे आरक्षण लांजा बस स्थानक या ठिकाणी केले जाते. ग्रुप बुकिंगद्वारे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय आगारा मार्फत घेण्यात आला आहे. तालुक्यातील चाकरमानी प्रवाशांनी या जादा एसटी बसेसच्या लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक श्रीमती काव्या पेडणेकर यांनी केले आहे.