-दापोलीतून 1672 लाभार्थी जाणार रत्नागिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-दापोलीतून 1672 लाभार्थी जाणार रत्नागिरीत
-दापोलीतून 1672 लाभार्थी जाणार रत्नागिरीत

-दापोलीतून 1672 लाभार्थी जाणार रत्नागिरीत

sakal_logo
By

२९ (टुडे पान १ साठी)


-rat२३p१८.jpg-
२३M०४४८०
दापोली : आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत.
----

दापोलीतून १६७२ लाभार्थी जाणार रत्नागिरीत

मुख्यमंत्री दौरा ; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा, ४२ बसेसची सोय

दाभोळ, ता. २३ : रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी दापोली तालुक्यातून १ हजार ६७२ लाभार्थी रत्नागिरीत जाणार आहेत. त्यांच्यासाठी ४२ बसेसची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी ११३ नोडल अधिकारी व सहाय्यक काम करत आहेत. प्रत्येक बसमध्ये प्रथमोपचार पेटी, ओआरएस ठेवण्यात येणार असून प्रत्येक बसमध्ये आशा सेविकाही असणार आहेत.
शासन आपल्या दारी या योजनेच्या कार्यक्रमासंदर्भात करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा दापोली येथील पंचायत समितीच्या सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. आढावा सभेला दापोली, मंडणगड व खेड तालुक्यातील शासकीय अधिकारी उपस्थित होते. लाभार्थ्यांना रत्नागिरी येथे जाण्यासाठी एसटी बसेसची सुविधा प्रशासनाने केली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांला सकाळी नाश्ता, पाण्याची बाटली देण्यात येणार आहे. दाभोळ, गुहागरमार्गे १३ बसेस जाणार असून उर्वरित बसेस खेड, चिपळूणमार्गे जाणार आहेत. सकाळी ५ वाजल्यापासून या बसेस सुटणार असून त्या १० वाजेपर्यंत रत्नागिरी येथे पोचतील याची काळजी घेण्यात येणार आहे.
आढावा बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार अर्चना बोंबे, खेड व मंडणगडचे तहसीलदार, दापोलीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, पोलिस निरीक्षक, आगार व्यवस्थापक, मुख्याधिकारी, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुकेरीकर आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते.