माजी विद्यार्थ्यांकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

माजी विद्यार्थ्यांकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

rat२३p१४.jpg-
०४४५३
मंडणगडः माजी विद्यार्थ्यांकडून सेवानिवृत्त शिक्षक सुनील भेकत यांना प्रतिमा भेट देण्यात आली.
--------------
माजी विद्यार्थ्यांकडून सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान
मंडणगडः सेवानिवृत्त झालेल्या न्यू इंग्लिश स्कुल तुळशी शाळेचे शिक्षक सुनील भेकत यांचा १९९८-९९ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी भेट घेत सन्मान केला. यावेळी त्यांना साईबाबा यांची प्रतिमा भेट देण्यात आली. ज्या शिक्षकांनी आपल्याला शिक्षित करून आदर्श जीवन जगण्याची शिकवण दिली, संस्कार केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांचे विद्यार्थी मिलिंद करावडे, समिर जालगावकर, सचिन शेडगे, नथुराम घाडे, किरण पिचूर्ले, नयना पिचूर्ले, राजेश्री भोजने हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
---------
दापोलीत संत सेना महाराज जयंती
दाभोळः श्री संत सेना महाराज यांची ७२३ वी जयंती दापोली तालुका नाभिक समाज संघटनेच्या वतीने दापोलीतील विठ्ठल मंदिर येथे तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे यांचे अध्यक्षतेखाली भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेला, तसेच शूरवीर सेनानी शिवा काशीद, जीवा महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. आरती करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी, आदर्श अंगणवाडी सेविका, ज्येष्ठ समाजबांधव, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, मॅरेथॉन स्पर्धक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संदेश चव्हाण, उदय शिंदे, पंचायत समिती माजी सभापती ममता शिंदे, उद्योजक शेखर कदम, ज्येष्ठ समाजबांधव सतीश चव्हाण, मारुती चव्हाण आदी होते.
------------
देवकेतील स्पर्धेत जालगाव चॅलेंजर विजेता
दाभोळः दापोली तालुक्यातील देवके येथे आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत जालगाव चॅलेंजर्स विजेता, तर आपताडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज तेरेवायंगणी संघाचा अक्षय जाधव, उत्कृष्ट गोलंदाज आपताडी संघाचा अभिषेक बर्जे, क्षेत्ररक्षक जालगाव चॅलेजर्सचा तेजस वायकर, मालिकावीर जालगाव चॅलेजर्सचा मनोज मोहिते यांना गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन सनी मोहिते यांनी केले. या वेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रोशन धोत्रे, संतोष धोत्रे, दत्तवाडी मुंबई मंडळ अध्यक्ष दीपक बैकर, गजानन बैकर, संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com