माने अभियांत्रिकीच्या मेकॅनिकलला चार पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माने अभियांत्रिकीच्या मेकॅनिकलला चार पुरस्कार
माने अभियांत्रिकीच्या मेकॅनिकलला चार पुरस्कार

माने अभियांत्रिकीच्या मेकॅनिकलला चार पुरस्कार

sakal_logo
By

rat२३p१३.jpg-
०४४५२
ठाणेः राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाला पुरस्कार प्रदान करताना इष्रेचे ठाणे विभागप्रमुख सागर मुनीश्वर तसेच इष्रे ठाणेचे पदाधिकारी.
-----------
माने अभियांत्रिकीच्या मेकॅनिकलला चार पुरस्कार
इष्रे समितीकडून सन्मान; महाविद्यालयासह शालेय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम
साडवली, ता. २३ः इंडिअन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडीशनिंग इंजिनिअर्स (इष्रे) समितीचे यंदाचे चार पुरस्कार देवरूख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाला जाहीर झाले. इष्रे समितीद्वारे महाविद्यालयाने मेकॅनिकल विभागामार्फत सलग तिसऱ्या वर्षी महाविद्यालयापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेतले. त्यात तांत्रिक चर्चासत्रे, सेमिनार, कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी यांचा समावेश आहे.
इष्रेकडून सहा पुरस्कारांसाठी नामांकने मागविली होती. त्यातून अकरा महाविद्यालये निवडण्यात आली. सहापैकी राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाने चार पुरस्कार प्राप्त करून इष्रेच्या ठाणे विभागामध्ये नावलौकिक मिळविला आहे. पुरस्कारांमध्ये जास्तीतजास्त टेक्निकल उपक्रम आयोजन तसेच विद्यार्थ्यांचा सहभाग साठीचे “बेस्ट टेक्निकल अॅक्टीविटी अवार्ड” तसेच “बेस्ट मॉडेल स्टुडंट चॅप्टर अवार्ड ”, जास्तीत जास्त सभासद नोंदणीसाठीचा “बेस्ट मेम्बरशिप अवार्ड” या विभागाला प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर “बेस्ट मोटीवेटींग फॅकल्टि अॅडवायझर अवार्ड” महाविद्यालयाचे इष्रे समितीचे सल्लागार प्रा. वैभव डोंगरे यांना घोषित करण्यात आला आहे. ठाणे येथील विहंग पाम क्लब येथे मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
इष्रेची स्थापना १९८१ मध्ये नवी दिल्ली येथे प्रख्यात एचव्हीएसी व्यावसायिकांच्या गटाने केली. आज इष्रेमध्ये ३० हजारपेक्षा जास्त एचव्हीएसी व्यावसायिक आणि विद्यार्थी-सदस्य आहेत. दिल्लीमध्ये मुख्यालय असलेल्या इष्रे संपूर्ण भारतभर पसरलेल्या ४१ समिती आणि उप समित्यांमधून कार्यरत आहे. या संघटनेचे नेतृत्व सोसायटीचे सदस्य असणा-या निवडक अधिकाऱ्यामार्फत केले जाते. हीटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडीशनिंग आणि रेफ्रिजरेशन अभियांत्रिकी आणि संबंधित सेवांच्या कला आणि विज्ञानातील प्रगती, व्याख्याने, कार्यशाळा, उत्पादन सादरीकरणे, प्रकाशने व प्रदर्शने यांच्याद्वारे सदर विज्ञानातील सदस्यांचे व इतर इच्छुक व्यक्तींचे निरंतर शिक्षण, त्या विज्ञानातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनाची आणि आर्थिक मदतीची व्याख्या, वैज्ञानिक संशोधनास प्रोत्साहन हि इष्रेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. या संपूर्ण यशामागे इष्रे समिती विद्यार्थी प्रमुख विद्यार्थी अनुप मेहेंदळे, इतर विद्यार्थी सदस्य यांनी मेहनत घेतली. त्यांना प्रा. वैभव डोंगरे, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सचिन वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष व माजी पालकमंत्री रविंद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.