-काजू उत्पादन,व्यापाराला मिळणार चालना

-काजू उत्पादन,व्यापाराला मिळणार चालना

७ ( पान २ साठी)

काजू उत्पादन, व्यापाराला चालना

राज्य काजू मंडळाचे कोंदण ; ब्रँड, जीआयचा प्रचार


दाभोळ, ता. २४ : आजपर्यंत केवळ दुर्लक्षित राहिलेल्या व राजाश्रयाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील काजू फळ पीकाला आता महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे कोंदण प्रप्त झाले आहे. यामुळे या आजवर दुर्लक्षित राहिलेल्या व कोकणचे अर्थकारण बदलण्याची ताकद असणाऱ्या काजूच्या उत्पादनाला व व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.
काजू लागवडीपासून काजू बीच्या विक्रीपर्यंत शेतकऱ्याना येणाऱ्या अडचणी विचारात घेवून कृषी व पणन विभागाच्या शासन निर्णयानुसार काजू फळपीक समिती विकास समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने १६ मे रोजी राज्यातील काजूच्या सर्वंकश विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात आली आहे. शिवाय याकरिता ५० कोटी भाग भांडवल देखील देण्याचा शासन निर्णय नुकताच झाला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य काजू मंडळ काजूची प्रक्रिया व विक्री या क्षेत्रात कार्यरत राहणार आहे.
यात राज्यातील काजू ब्रँड तयार करून त्याची जाहिरात व प्रसिद्धी करणे, काजू पिकास मिळालेल्या जीआय मानांकनाचा विस्तार करणे, काजू मंडळाची वेबसाईट तयार करणे, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांव्दारे काजू ब्रँडचा व जीआयचा प्रचार व प्रसिद्धी करणे व वेबसाईट व्दारे ब्रँडचा प्रचार व प्रसार करणे, प्रशिक्षण वर्ग व प्रत्यक्षिक इत्यादींचे आयोजन करणे, असे रचनात्मक कार्य राहणार आहे. तसेच मूल्यवर्धनाबाबत काजू प्रिकाच्या उद्योग उभारण्यात चालना देणे, काजूवर प्रक्रिया करणारे प्रकल्प वर्षभर चालू राहण्याकरिता काजू बी खरेदी करून प्रक्रिया उद्योगांना उपलब्ध करून देणे, प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या आधुनिक मध्यवर्ती सुविधा उभारणी करण्यास चालना देणे व उभारणी देणे, काजू उद्योगातून पदार्थ बनवण्यासाठी उद्योगांना प्रेत्साहन देणे या बाबी करण्यात येणार आहेत. तसेच मार्केटिंग या हेड खाली काजू विक्रीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे, देशांतर्गत व्यापारात चालना देणे, काजू निर्यातीस मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे, काजू उत्पादक, विक्रेते, प्रक्रियादार, ग्राहक, निर्यातदार यांची नोंदणी करणे व त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करणे आधी कामे होणार आहेत. महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे कार्यक्षेत्र हे राज्यातील संपूर्ण कोकण विभाग, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुका राहणार आहे
-----
असा होणार फायदा

*काजूबाबत व्यवसाय विकास आराखडा
*रिटेल क्षेत्रातील कंपन्यांना सुविधा
*आवश्यक काजूचा पुरवठा करणे
*प्रकल्प अहवालासह उभारणी करणे
*काजू उत्पादकांना शेतमालधारण कर्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com