सावरकर नाट्यगृहाची अवस्था नाकापेक्षा मोती जड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावरकर नाट्यगृहाची अवस्था नाकापेक्षा मोती जड
सावरकर नाट्यगृहाची अवस्था नाकापेक्षा मोती जड

सावरकर नाट्यगृहाची अवस्था नाकापेक्षा मोती जड

sakal_logo
By

८ (पान २ साठीमेन)


-rat२३p.jpg-
23M04522
रत्नागिरी ः स्वा. सावरकर नाट्यगृह
-----------
नाट्यगृहाची अवस्था नाकापेक्षा मोती जड

जबाबदारीबाबत एकमेकाकडे बोट ; खर्चाची यादी वाढतीच

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी, ता. २३ : कोकणातील सर्वांत मोठ्या वि. दा. सावरकर नाट्यगृहातील गैरसुविधांचे अभिनेता भरत जाधव यांनी वाभाडे काढले. यामुळे रत्नागिरी शहरचे नाव नाट्यक्षेत्रामध्ये बदनाम झाले. याची जबाबदारी आता कोणीही घ्यायाल तयार नाही. परंतु नाट्यगृहाचे वास्तव पाहिले तर चित्र विदारक आहे. नाट्यगृहापासून ५ वर्षात मिळणारे उत्पन्न अवघ्या लाखावर आले आहे. जनरेटर देखभाल दुरूस्तीसाठी पावणे पाच लाख खर्च, वातानुकुलीत यंत्रणेवरील खर्च ९७ हजार ते २२ लाखापर्यत, साऊंड सीस्टिमवर दोन वर्षांमध्ये ६ लाख रुपये खर्च झाला आहे. नाकापेक्षा मोती जड, अशीच परिस्थिती नाट्यगृहाची झाली आहे.
अभिनेता भरत जाधव यांनी प्रयोगानंतर नाट्यगृहाबाबत दिलेल्या तिखट प्रतिक्रियेनंतर नाट्यगृहाच्या देखभाल दुरूस्तीवरून जोरदार वादंग सुरू झाले आहे. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वातानुकूलित यंत्रणेबाबतची जबाबदारी झटकली असून जनरेटमधील इंधनाची जबाबदारी आयोजकांची असल्याचे सागितले. तर आयोजकांनी याबबतची जबाबदारी पालिकेवर टाकली आहे. या वादामुळे नाट्यक्षेतात बदनामी झाली ती रत्नागिरीच. त्यामुळे जबाबदारी झटकण्यापेक्षा संबंधितांनी आता आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. याबाबतची लेखा जोखा समाजसेवक विजय जैन यांनी माहितीच्या अधिकारी खाली मागवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामध्ये पालिकेने गेल्या पाच वर्षांध्ये नाट्यगृहावर विविध हेडखाली केलेला खर्च आणि नाट्यगृहापासून मिळणारे उत्पन्न यातील तफावत प्रचंड आहे.
रत्नागिरी पालिकेच्या मालकीच्या वि. दा. सावरकर नाट्यगृहासासून २०१७-१८ ला मिळालेले वार्षिक उत्पन्न ७ लाख ६५ हजार ६००, २०१८-१९ ला ६ लाख ६१ हजार ८३३, २०१९-२० ला ६ लाख २५ हजार एवढे उत्पन्न मिळत होते. त्यानंतर मात्र या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली. परंतु पालिकेने याचा विचारच केलेला नाही. गैरसुविधांचा हा परिणाम आहे. २०२०-२१ मध्ये अवघे १ लाख ३ हजार तर २०२१-२२ मध्ये फक्त १ लाख वार्षिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र २०१७ पासून नाट्यगृहाच्या एसी चालविण्यासाठी लागणाऱ्या जनरेटरच्या देखभाल दुरूस्ती आणि इंधनावर झालेला खर्च उत्पन्नाच्या चौपट आहे.
-----
असा झालाय खर्च
नाट्यगृहाच्या एसी यंत्रणेची वार्षिक देखभाल दुरूस्तीवर गेल्या पाच वर्षामध्ये ९७ हजारापासून ते २२ लाख ५१ हजार एवढा खर्च झाला आहे. साऊंड सीस्टिमवर तर २०१७ ला ३ लाख ३९ हजार आणि २०१८ मध्ये २ लाख ८० हजार खर्च झाला आहे.