
‘कृषी उत्पन्न’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
04505
सिंधुदुर्गनगरी ः कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापतींना शुभेच्छा देताना नीलेश राणे. सोबत मनीष दळवी, अतुल काळसेकर, संदेश सावंत व अन्य.
‘कृषी उत्पन्न’च्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
सिंधुदुर्गनगरीत सोहळा; नूतन संचालक मंडळास मान्यवरांच्या शुभेच्छा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ ः सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदी तुळशीदास रावराणे, तर उपसभापती श्रद्धा सावंत यांची आज निवड करण्यात आली. नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय सभागृहामध्ये करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, महेश सारंग, प्रकाश बोडस, प्रज्ञा ढवण, समीर सावंत, बाबा परब, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रदीप मांजरेकर, अशोक पराडकर, सदानंद सर्वेकर, प्रसाद पाटकर, मकरंद जोशी, सच्चिदानंद गोलतकर, सुजाता देसाई, अजय आकेरकर, सूर्यकांत बोडके, किरण रावले, दिलीप तवटे, आनंद ठाकूर, संतोष राऊळ, मंगेश ब्रम्हदंडे, पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे, अशोक सावंत, आनंद शिरवलकर, संतोष कानडे, संजय आंग्रे, संदेश पटेल, अजय रावराणे, सुनील लाड आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुदुर्गची २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीची निवडणूक मागील महिन्यात घेण्यात आली. आज समितीचे सभापती, उपसभापतींची निवड बाजार समितीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल रहीज यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापतिपदी रावराणे, तर उपसभापती श्रद्धा सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी उर्मिला यादव, कृष्णा मयेकर, अजय हिर्लेकर उपस्थित होते. निवड प्रक्रियेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती व उपसभापती, समितीचे संचालक मंडळांनी जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट दिली. या सर्वांचे स्वागत जिल्हा बँकेचे अध्यक्ष दळवी, उपाध्यक्ष काळसेकर यांनी केले. यावेळी माजी खासदार नीलेश राणे यांनी नवनियुक्तांचा सत्कार केला. जिल्हा बँक उपाध्यक्ष काळसेकर यांनी उपस्थित नूतन संचालक मंडळास शुभेच्छा दिल्या.