कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी स्वावलंबन योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन
कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

sakal_logo
By

कृषी स्वावलंबन योजनेचा
लाभ घेण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून २०१६-१७ पासून अनुसुचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवत आहे. या योजनेचा लाभ तालुक्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी करिश्मा नायर व सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले आहे.
या योजनेमध्ये अनुसुचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी नवीन विहिरीसाठी दोन लाख ५० हजार रुपये, जुनी विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, इनवेल विंधन विहिरीसाठी २० हजार रुपये, पंपसंच २० हजार रुपये, वीज जोडणीसाठी १० हजार रुपये व शेततळे अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये, तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुक्रमे २५ हजार व ५० हजार रुपये अशी अनुदानाची मर्यादा आहे. वैयक्तिक लाभार्थी निवडताना महिला व अपंग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑनलाईन लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. अनुदानाची रक्कम थेट हस्तांतरण पध्दतीने लाभार्थीच्या आधार जोडणी केलेल्या बँक खात्यावर जमा करणेत येणार आहे. या योजनेचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन करिश्मा नायर व अरुण चव्हाण यांनी केले आहे.