रामपुर आरोग्य केंद्राला दोन लाखाचा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामपुर आरोग्य केंद्राला दोन लाखाचा पुरस्कार
रामपुर आरोग्य केंद्राला दोन लाखाचा पुरस्कार

रामपुर आरोग्य केंद्राला दोन लाखाचा पुरस्कार

sakal_logo
By

रामपूर आरोग्य केंद्राला पुरस्कार
आज वितरण; आंबडवे उत्कृष्ट उपकेंद्र
रत्नागिरी, ता.२३ः कायाकल्प योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा २ लाखाचा पुरस्कार रामपुरला तर आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचा एक लाखाचा पुरस्कार आंबडवेला जाहीर झाला आहे. तसेच जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या ६ आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांना फलोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार, कायाकल्पतील ११ उपकेंद्र व १३ प्राथमिक आरोग्य केंद्र, सर्वोकृष्ट काम केलेल्या ९१ आशा स्वयंसेविका या सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे. हा कार्यक्रम २४ मे रोजी रत्नागिरीत होणार आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित हा कार्यकम २४ रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री जिल्हा रत्नागिरी उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी येथील लोकनेते कै. शामरावजी पेजे सभागृह येथे आयोजित केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र २०२१-२२ सालात प्रथम क्रमांकासाठी २ लाख व प्रोत्साहनपर ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. या पुरस्कारात रामपुरला प्रथम क्रमांक तर प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी शिरगाव, कापरे, दादर, ओणी, अडरे (चिपळूण), कोळवली (गुहागर), कोरगाव (खेड), जैतापूर, धारतळे (राजापूर), कुंबळे (मंडणगड), साटवली (लांजा) यांची निवड झाली आहे.
कायाकल्पअंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचा एक लाखाचा प्रथम पुरस्कार आंबडवेला तर भिलेला ५० हजार रुपयांचे प्रथम रनरअप आणि ३५ हजार रुपयांचा द्वीतीय रनरअपचा मान निरवाळला मिळाला. प्रोत्साहनपर २५ हजार रुपये पेढांबे, टेरव, कोळकेवाडी, मांडकी, पिंपळीखुर्द, वेळणेश्‍वर, काटवली, मांडवे या उपकेंद्रांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय फलोरेन्स लाईटिंगेल आरोग्य सहाय्यिकेचा प्रथम पुरस्कार सिमा गोविंद कवठणकर (कापरे), द्वीतीय अंजली विलास गोरे (साटवली), तृतीय मिनल मंगेश भाटकर (साखळोली) तर आरोग्य सेविका पुरस्कार ममता महेंद्र माडवे (कापरे), साधना सुरेश झोरे (जावडे), सुप्रिया एकनाथ यादव (जावडे) यांना प्रदान केला जाणार आहे. सर्वाधिक प्रसुती केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चांदेराई, हेदवी आणि धारतळे, तर उपकेंद्रांमध्ये सागवे, वेळणेश्‍वर, जालगाव यांचा समावेश आहे. सर्वात चांगले काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांमध्ये २५ हजाराचे पहिले पारितोषीक हांतखंबा येथील निकिता नितीन कदम, चांदेराईतील पुजा विजय पांचाळ यांना द्वितीय तर कुभंवडेच्या अमृता सचिन चिंदरकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. तालुकास्तरावर प्रथम पारितोषी मिळालेल्या ७० आशा स्वयंसेविकांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे.