रत्नागिरी- पथनाट्यातून उलगडले सावरकांचे शौर्य

रत्नागिरी- पथनाट्यातून उलगडले सावरकांचे शौर्य

rat23p20.jpg-
04523
रत्नागिरी : सावरकर जागरण सप्ताहात मंगळवारी लक्ष्मीचौक येथे पथनाट्य सादर करताना देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी.
(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
------------
पथनाट्यातून उलगडले सावरकांचे शौर्य
विचार जागरण सप्ताह ; क्रांतीवीरांचा अपमान न करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : इंग्रजांना जाब विचारणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, अनेक क्रांतीवीरांना प्रेरणा देणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे असे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा आज पोवाडा व पथनाट्यातून उलगडली. भारतमातेच्या या महान क्रांतीवीराचा अवमान करू नये, अशी विनंती या वेळी करण्यात आली. भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य आज लक्ष्मीचौक आणि मंगळवार आठवडा बाजार येथे सादर केले. या पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्यावतीने सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
आज सकाळी पथनाट्य, पोवाडा सादरीकरण झाले. यामध्ये शाहीर मयुरेश आगरे, ढोलकी वादक दर्शन शिंदे, वीर सावरकर अथर्व राडये आणि जनरल बॅरीच्या भूमिकेत मीत भोवड यांनी भूमिका बजावल्या. कोरसमध्ये आदित्य पायरे, रोहित जाधव, चिन्मयी पालकर, अमृता करमरकर, वैष्णवी बाणे, प्रियांका साखरपेकर, ऋतुजा भोवड, मिथिला वाडेकर, प्राजक्ता राडये आदी सहभागी झाले.
वीर सावरकरांच्या पुतळ्याला उद्योजक गौरांग आगाशे, संयोजक रवींद्र भोवड व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. येथे अनेक सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते. त्यानंतर मंगळवार आठवडा बाजार येथे भरपूर गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य सादर केले. वीर सावरकरांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बाजारात खरेदीसाठी आलेल्या महिला, नागरिकांनीही या सर्व चमूचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com