कुणकेश्‍वर पर्यटकांनी गजबजले

कुणकेश्‍वर पर्यटकांनी गजबजले

04533
कुणकेश्‍वर ः येथील समुद्रकिनारा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

कुणकेश्‍वर ‘हाउसफुल्ल’

किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी; दर्शनासाठीही भाविकांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २३ ः उन्हाळी सुटीमुळे कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर पर्यटकांनी गजबजले आहे. कुणकेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग असते. समुद्रकिनाराही पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता. तालुक्याच्या विविध हॉटेलमध्येही पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. खासगी वाहने घेऊन पर्यटक येत असल्याने रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीतही मोठी वाढ झाल्याचे चित्र होते.
उन्हाळी सुटी असल्याने तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी जाणवू लागली आहे. तालुक्यातील कुणकेश्‍वरपासून विजयदुर्गपर्यंतच्या किनाऱ्यावर जागोजागी पर्यटकांची गर्दी जाणवत आहे. श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे दर्शन आणि समुद्र किनारी बागडण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येताना दिसत आहेत. येथील पवनचक्की उद्यान, समुद्रकिनारा, किल्ला गणेश मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असल्याचे जाणवत आहे. किल्ले विजयदुर्ग व श्री देव रामेश्‍वर मंदिर येथेही पर्यटक येताना दिसत आहेत. कुणकेश्‍वर येथील भक्तनिवासाला पर्यटकांची पसंती असून विविध भागातील पर्यटक मुक्कामाला राहत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरात मोठी गर्दी होत असून दर्शनासाठी रांग असते. किनारी भागातील भेळ, आईस्क्रीम तसेच अन्य विक्रेत्यांकडे खवय्यांची मोठी पसंती असते. कुणकेश्‍वर समुद्रकिनार्‍याबरोबरच तेथून देवगडला येताना वाटेतील मिठमुंबरी समुद्रकिनाराही गर्दीने फुलून गेलेला असतो. संपूर्ण रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. खासगी वाहने घेऊन मोठ्या प्रमाणात पर्यटक येताना दिसत आहेत. स्थानिक हॉटेलमध्येही प्रतिसाद वाढला आहे. कोकण भेटीमध्ये खास मासळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक आतुर असतात. याचबरोबर येथील घावणे, आंबोळी तसेच शेवया आदी नाश्त्यासह कोकणी पदार्थांनाही मागणी असते. कोकण दौऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची कोकणी पदार्थांना पसंती असते. येथील मासळीचा आस्वाद घेण्यासाठीही पर्यटकांची खास पसंती असते. त्यामुळे या काळात मासळीच्या हॉटेलमध्ये गर्दी होताना दिसत आहे. उन्हाळी सुटीमुळे पर्यटकांना सोयीचे झाले आहे. येथील आंबा, फणस यांनाही पर्यटकांकडून मागणी असते.
.....................
चौकट
वाहतूक कोंडीचा त्रास
साधारणपणे गणपतीपुळे ते मालवण असा किनारी भागातून पर्यटकांची भ्रमंती असते. किनारी भागातून अंतर कमी पडत असल्याने तसेच वाटेत अनेक सौंदर्यस्थळे पहाता येत असल्याने पर्यटकांचा वावर किनारी भागातच अधिक असतो. विशेषतः विकेंडला या भागाला पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळते. येणारे पर्यटक खासगी वाहने घेऊन येत असल्याने रस्त्यावरील वर्दळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे बाजारात काहीवेळा वाहतूक कोंडीचेही प्रकार घडत आहेत. वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे स्थानिक बाजारातील उलाढालीत मोठी वाढ झाल्याचे चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com