आरती फाऊंडेशनला आर्थिक मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरती फाऊंडेशनला आर्थिक मदत
आरती फाऊंडेशनला आर्थिक मदत

आरती फाऊंडेशनला आर्थिक मदत

sakal_logo
By

ratchl२३५.jpg-
०४५२७
चिपळूणः आरती निराधार सेवा फाऊंडेशनला आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करताना आमदार शेखर निकम.
-------------
आरती फाऊंडेशनला आर्थिक मदत
चिपळूणः आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने पेढे- परशुराम येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशनला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ५० हजार रूपयांची आर्थिक मदत प्राप्त झाली आहे. तालुक्यातील पेढे-परशुराम येथे आरती निराधार सेवा फाऊंडेशन दिव्यांग मुलांचे व वृद्धांचे वसतिगृह आहे. येथे निराधार मुलांचे व वृद्धांचे काळजीपूर्वक संगोपन केले जाते. राहण्याची उत्तम सोय आणि आधार दिला जातो. या फाऊंडेशनच्या सामाजिक कामाला मदतीचा हात देण्याचा प्रस्ताव रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व संचालक मंडळ यांच्यासमोर आमदार निकम यांनी ठेवला होता. तो मान्य करत बँकेकडून आरती फाऊंडेशनला आर्थिक मदत देण्यात आली. धनादेश स्विकारताना आरती फाऊंडेशनचे संस्थापक अनिता नारकर, आत्माराम नारकर, नाम जोशी, संगमेश्‍वर सुजित महाडिक, मीनल काणेकर, नरेश कदम, प्रतीक चव्हाण आदी उपस्थित होते.
-------
चिपळुणात महिला कबड्डीचा थरार
चिपळूणः रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वराज्य स्पोर्टस्‌ ॲकॅडमी चिपळूणतर्फे २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील क्रीडा संकुलात महिला गटाच्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा महिला खेळाडूंसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ११ हजार १११ रुपये व चषक, द्वितीय क्रमांकास ७ हजार ७७७ रुपये, तृतीय क्रमांकास ५ हजार ५५५ रुपये, चतुर्थ क्रमांकास ४ हजार ४४४ रुपये पारितोषिक ठेवले आहे. उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकडसाठी रोख रक्कम तर सर्वोत्कृष्ट खेळाडूला एअर कुलर व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांमधील भाग्यवान महिलेला एअर कुलरचे बक्षीसही देण्यात येणार आहे. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्वराज्य स्पोर्टस्‌‍ ॲकॅडमीच्या अध्यक्षा जान्हवी (श्रध्दा) हुंबरे, राखी सकपाळ, अंकिता पवार, यांच्यासह सदस्या ऋतुजा ढगळे, पायल रेडीज आदी पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.
---------
ratchl२३६.jpg

चिपळूणः विठ्ठल खरात यांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करताना आमदार शेखर निकम.
----------

विठ्ठल खरात यांना आर्थिक मदत
चिपळूणः खडपोली येथे लागलेल्या वणव्यात घर व गोठा जळून खाक होऊन मोठे नुकसान झालेल्या विठ्ठल खरात यांना आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दहा हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. १७ एप्रिलला खडपोली येथे ही घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच आमदार शेखर निकम यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. झालेले नुकसान पाहता तत्काळ स्वतः मदतीचाही हात दिला होता. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि संचालक मंडळ यांना घटनेबद्दल सूचित केले होते. त्यानुसार सोमवारी जिल्हा मध्यवर्ती बँक रत्नागिरी यांच्या माध्यमातून १० हजार रुपयांचा धनादेश आर्थिक मदत स्वरूपात विठ्ठल खरात यांना देण्यात आला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मीनल काणेकर, बँकेचे कर्मचारी नरेंद्र कदम, प्रतीक चव्हाण, चिपळूण धनगर समाजाचे ग्रामस्थ शांताराम येडगे, शंकर खरात आदी उपस्थित होते.
-------
मेडिकल कर्मचारी संघटनेचे स्नेहसंमेलन
चिपळूणः तालुका मेडिकल कामगार संघटनेतर्फे आयोजित केलेले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. चिपळूण तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, सचिव समीर वाजे, रवी शिंदे, अविनाश खेडेकर आदी उपस्थित होते. या स्नेहसंमेलनामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक कामगाराने आपले मनोगत व्यक्त केले. या सर्व कामगार बांधवांना श्री. देशमुख व श्री. वाजे यांनी मार्गदर्शन केले.