ठाकरे शिवसेनेला मालवणात धक्का

ठाकरे शिवसेनेला मालवणात धक्का

04506
आचरा ः चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांनी नीलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

ठाकरे शिवसेनेला मालवणात धक्का

नीलेश राणेंच्या उपस्थितीत बुधवळे सरपंचांसह अनेकजण भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २४ ः येथे बुधवळे सरपंच संतोष पानवलकर, शिववउद्योग आघाडी तालुकाप्रमुख मंगेश गावकर यांच्यासह चिंदर, बुधवळे, हडी येथील अनेकांनी एका कार्यक्रमादरम्यान माजी खासदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. मंगळवारी (ता.२३) रात्री हा पक्षप्रवेश झाल्याचे भाजपकडून तसे जाहीर करण्यात आले. त्यामुळे तालुक्यात ठाकरे गट शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, संतोष कोदे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गावकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जेरॉन फर्नांडिस, जगदीश पांगे, संतोष गावकर, समीर बावकर, देवेंद्र हडकर, मुजफ्फर मुजावर, पळसंब सरपंच महेश वरक, अवधूत हळदणकर, दीपक सुर्वे, विक्रांत नाईक, ललित चव्हाण, मनोज हडकर, बाबू कदम आदी उपस्थित होते.

श्री. राणे म्हणाले, ‘‘भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचे स्वागत करत आहे. प्रवेश करताना कोणतीही अट घातली नाही, हा तुमचा मोठेपणा आहे. आपण ज्या पक्षात होता, त्याठिकाणी आपली कामे झाली नाही. मात्र, आता जी-जी विकासकामे सांगाल ती होतील. केंद्रात नारायण राणे आहेत. त्यांचे या जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे. आपल्याला रवींद्र चव्हाण यांच्यासारखे पालकमंत्री मिळाले आहेत. या मतदारसंघात नऊ वर्षात ज्यांची सत्ता होती जे आमदार, खासदार होते त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, आता आपली सत्ता आली. तालुक्यात या एकाच वर्षी ९० कोटी विकासनिधी आला आहे. तालुक्याला आपले आमदार, खासदार नसताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निधी दिला. यापुढेही विकासकामे होत राहतील. यापुढे याठिकाणी भाजपचाच आमदार होणार आहे.’’ यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी विचार मांडले. राणे यांच्या कार्याचे विकासनिधी खेचून आणण्याच्या कर्तृत्वाचे कौतुक केले.
चिंदरकर म्हणाले, ‘‘तालुका अनेक दिवस विकासकामांच्या प्रतीक्षेत होता. राणेंच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत विकास उतरला. जनतेला चुकीची आश्वासने देऊ नका, ही निलेश राणेंची शिकवण आहे. पालकमंत्री चव्हाण व निलेश राणेंचे बॉंडिंग चांगले आहे. त्यामुळे तालुक्यात विकास निधी प्रचंड येत आहे.’’ श्री. सावंत म्हणाले, ‘‘आपल्या मतदारसंघात नीलेश राणेंच्या रूपाने सक्षम नेतृत्व भेटले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कामाचा ध्यास घेणारे नेतृत्व आहे. सर्व कामे मार्गी लागत आहेत. जे जे सहकार्य लागेल ते पक्ष म्हणून आम्ही करू.’’
यावेळी चिंदर ग्रामपंचायत सदस्य नीलेश रेवडेकर, स्वरा पालकर, जान्हवी घाडी, हडी ग्रामपंचायत सदस्य ऋषीकेश आस्वलकर यासह बुधवळे येथील दिपक येरम, ऋषीकेश येरम, किरण जोईल, कृष्णा साटम, वैभव वाघ, अनिल येरम, आप्पा येरम, अमर सरमळकर, अविनाश सरमळकर, प्रकाश जाधव, अनंत सरमळकर, समिर टेंबुलकर, समिर घागरे, चिंदर येथील अरूण घाडी, भाई तावडे, प्रमोद परब, सागर परब, प्रमोद घाडी, केशव घाडी, नंदकुमार घाडी, अनिल घाडी, दिपक घाडी, दादू घाडी, गिरीश पवार, निखिल घाडी, हर्षाली गोलतकर, भारती गोलतकर, श्रेया पालकर, वासुदेव घाडी, गणेश पाटणकर, आशिर्वाद तावडे, रमेश घाडी, सचिन जाधव, संजय घाडी, नारायण घाडी, हेंमत घाडी, गणेश पाताडे, सौरभ परब, मंदार घाडी, शेखर पालकर, शिशिर पालकर, विद्याधर पालकर, शंकर पालकर, मनिष सावंत, अनंत आचरेकर, गणेश पालकर, नित्यानंद मेस्री, राजन पालकर, आत्माराम पालकर, रविंद्र पालकर, हडी येथील अनंत सुभेदार, तेजम शेडगे, अजिंक्य तोंडवळकर आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.
.................
04507
कणकवली ः बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांची भेट घेत आपण शिवसेनेतच असल्याचे स्पष्ट केले.

मी उद्धव ठाकरे शिवसेच्या
सोबतच ः पानवलकर

कल्पना न देताच भाजपकडून जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले, असे बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी आज स्पष्ट केले. आज पानवलकर यांनी स्वतः कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन आपण कायम आमदार नाईक आणि शिवसेनेसोबत राहणार असल्याचे सांगितले.
मला सर्वसामान्य शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी निवडून दिले आहे, याची पूर्णतः जाण आहे. त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे चुकीची माहिती देणारे भाजप पदाधिकारी तोंडावर पडले आहेत, असे आमदार नाईक यांनी म्हटले आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार नाईक यांनी पानवलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपकडून सरपंचाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. इतर सरपंचांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी आमदार, खासदारांनी केल्या. यावेळी विभाग संघटक संतोष घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, शाखाप्रमुख अभिमन्यू येरम, ग्रामपंचायत सदस्य राजू घागरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com