ः क्राईम पट्टा

ः क्राईम पट्टा

४२ (पान ३ साठी)

आंबा विक्रेत्या महिलेसह दोघांना मारहाण

रत्नागिरी ः शहराजवळील हातखंबा तिठा येथे हापूस आंबा विक्री करणाऱ्या महिलेसह बहिण व तिच्या पतीला तिघांनी मारहाण केली. या प्रकरणी तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शांताराम शिवगण, ऋषिकेश भायजे अशी संशयितांची नाव आहेत. हा प्रकार रविवारी (ता. २१) सायंकाळी घडला. फिर्यादी या पतीच्या त्रासाला कंटाळून वेगळ्या राहतात. रविवारी त्या हातखंबा तिठा येथे आंबा विक्री करत असताना त्यांचा संशयित पती तेथे येऊन शिवीगाळ करू लागला म्हणून फिर्यादींनी शिवागीळ करण्याचे कारण विचारले. त्याचा पतीला राग आला आणि त्याने फिर्यादी यांना हाताने मारण्यास सुरवात केली. त्यावेळी तेथे आंबा विक्री करणाऱ्या फिर्यादीची बहीण समिक्षा कोरगावकर व तिचे पती समीर कोरगावकर हे मारहाण सोडविण्यासाठी पुढे गेले. त्यावेळी फिर्यादी यांची नणंद व तिचा मुलाने फिर्यादीची बहीण व तिच्या पतीला मारहाण केली. फिर्यादी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.
----------
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी ः शहराजवळील मुरुगवाडा-पांढरासमुद्र येथील वाळूवर विदेशी मद्य प्राशन करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋतीक प्रवीण अडुरकर असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस पेट्रोलिंग करत असताना संशयित ऋतिक पांढरा सुमद्र येथील वाळूवर विदेशी मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
------
गावठी दारु विक्री करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील साठरे बांबर-बौद्धवाडी रस्त्यावर अवैद्य हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष भिकाजी पवार असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार साठरेबांबर-बौद्धवाडी रस्त्यावर निदर्शनास आला. संशयित पवार यांनी अवैद्य हातभट्टीची दारु विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगली असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
------
समुद्रात बुडून तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी ः शहराजवळील मुरुगवाडा-पांढरा समुद्र येथील समुद्रात तरुणीने बुडाली. तिला बेशुद्धावस्थेत उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. कीर्ती जयेश बोरकर (वय १९, रा. मुरुगवाडा-मिऱ्यारोड, रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-------
दारु विक्री प्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः तालुक्यातील कोतवडे-घारपुरेवाडी येथे विनापरवाना हातभट्टीची गावठी दारु विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (ता. २२) घारपुरेवाडी-कोतवडे येथे निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
-------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com