मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योजनेतील 41 कोटींचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योजनेतील 41 कोटींचे वाटप
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योजनेतील 41 कोटींचे वाटप

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत योजनेतील 41 कोटींचे वाटप

sakal_logo
By

४७ (पान ३ साठी)

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
योजनेतील ४१ कोटींचे वाटप

उदय सामंत : इंजिनिअरिंग कॉलेजला स्व. शामराव पेजेंचे नाव

रत्नागिरी, ता. २३ : ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या निमित्ताने जिल्ह्यातील ९० हजार लाभार्थ्यांना दाखले व विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यातील तब्बल २५ हजार जणांना २५ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध योजनांमधून ४१ कोटींचे वाटप केले जाणार आहे. उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी पहिल्यांदा वातानुकूलीत मंडप उभारला जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्व. शामराव पेजे यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेला आहे, असेही त्यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहातील नवीन कॉन्फरन्स रुमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, शासन आपल्या दारी योजनेचा दिवसभरात दापोली, चिपळूण व रत्नागिरी येथे नऊ तालुक्यातील विविध योजना व लाभर्थ्यांचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार जणांपैकी ५२ हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. २५ मे रोजी तब्बल २५ हजार जणांना लाभ दिला जाणार आहे. यावेळी विविध योजनांमधून तब्बल ४१ कोटी रुपयांचे वाटप लाभार्थ्यांना होणार असून ५० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७५ दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी बाईक, ४५ व्यक्तींना कृषी विभागामार्फत अत्याधुनिक औजारे, १५० कामगारांना किटचे वाटप यावेळी होणार आहे.