मालवणात उद्यापासून पर्यटन हंगामास पुर्णविराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात उद्यापासून पर्यटन हंगामास पुर्णविराम
मालवणात उद्यापासून पर्यटन हंगामास पुर्णविराम

मालवणात उद्यापासून पर्यटन हंगामास पुर्णविराम

sakal_logo
By

04583
मालवण ः पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आला असून किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी मंगळवारी बंदरजेटी पर्यटकांनी अशी बहरून गेली होती.

मालवणात उद्यापासून पर्यटन हंगामास पुर्णविराम

मेरिटाईम बोर्ड; किल्ला दर्शनासह जलक्रिडा बंदची सूचना

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २३ ः येथील पर्यटन हंगामाची येत्या गुरुवारी (ता.२५) सांगता होत आहे. यानंतर किल्ले दर्शनासह साहसी जलक्रीडा प्रकार बंद करण्याच्या सूचना मेरिटाईम बोर्डाने सर्व व्यावसायिकांना दिल्या आहेत. त्यानुसार येथील बंदर विभागाच्यावतीने किनारपट्टीवरील संबंधित सर्व व्यावसायिकांना सूचना केल्या आहेत. मच्छीमारांना ज्याप्रमाणे ३१ मेपर्यंतची मुदत दिली आहे, त्याचप्रमाणे प्रवासी होडी वाहतुकीसही कायमस्वरूपी मुदत देण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने मेरिटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, बंदरविकास मंत्री, आमदार यांना पाठविण्यात आले आहे.
यावर्षीच्या पर्यटन हंगामास सप्टेंबरमध्ये सुरवात झाली. हंगामाच्या सुरवातीच्या काळात पर्यटकांचा ओघ फारसा नव्हता. इयर ऐंडिंग, ख्रिसमस सुट्टीच्या काळात मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे येथील पर्यटन बहरल्याचे दिसून आले. पर्यटन हंगामात पर्यटकांची तारकर्ली, देवबाग येथील साहसी जलक्रीडा प्रकार यासह शहरातील दांडी, बंदर जेटी परिसर, चिवला बीच, सर्जेकोट, तळाशील किनारपट्टी भागात पर्यटकांनी साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटल्याचे दिसून आले. यामुळे येथील पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून आले. किल्ले सिंधुदुर्ग सह रॉकगार्डन यालाही लाखो पर्यटकांनी भेटी दिल्या. यातून बाजारपेठेतही चांगली उलाढाल झाल्याचे पहावयास मिळाले. उन्हाळी सुटी काळातही येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. पर्यटन हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून २५ ला या हंगामाची सांगता होणार आहे. या अनुषंगाने मेरिटाईम बोर्डाने किल्ले प्रवासी वाहतुकीबरोबरच अन्य जलक्रीडा व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत.
-------------
चौकट
मुदतवाढीची मागणी
सर्वसाधारणपणे ३१ मेपर्यंत समुद्रातील वातावरण चांगले राहत असल्याने मच्छीमारांप्रमाणे किल्ला प्रवासी वाहतुकीलाही ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने मेरिटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट करत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही काही दिवसांची मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
------------------
किल्ले सिंधुदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या
महिना*पर्यटक*लहान मुले
सप्टेंबर*३८२२*
ऑक्टोबर*२४९५८*११२१
नोव्हेंबर*३६७११*२९३२
डिसेंबर*७८०३*७१२३
जानेवारी*५०९४१*५०३०
फेब्रुवारी*२६८२१*२५४९
मार्च*११७८५*८०७७
एप्रिल*३५५९१*८७०
-------------
एप्रिल अखेरपर्यंत २,२६,१३४ लाख पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली.
-----------------