‘त्या’ मुलीस मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास तात्काळ अटक करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ मुलीस मारण्याचा प्रयत्न 
करणाऱ्यास तात्काळ अटक करा
‘त्या’ मुलीस मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास तात्काळ अटक करा

‘त्या’ मुलीस मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास तात्काळ अटक करा

sakal_logo
By

04496
बांदा : पोलिसांना निवेदन देताना अर्चना घारे. शेजारी पुंडलिक दळवी, अॅड. सायली दुभाषी, दर्शना बाबर-देसाई आदी.

‘त्या’ मुलीस मारण्याचा प्रयत्न
करणाऱ्यास तात्काळ अटक करा

राष्ट्रवादीची मागणी; पोलिसांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः तालुक्यातील एका गावातील मुलीचा तेथीलच युवकाने विनयभंग करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीला अटक करून त्यांना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बांदा पोलिस ठाणे अंमलदार तेली यांना देण्यात आले.
यावेळी अर्चना घारे म्हणाल्या, ‘‘देशातील सर्वांत प्रगत व विकसनशील असणाऱ्या आपल्या राज्यात भगिनी सुरक्षित नसल्याने तर इथे असणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विनयभंग करून अत्यंत क्रूरपणे पीडितेचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची मानसिकता या समाजासाठी अत्यंत घातक असून अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. संबंधित गुन्हेगारास लवकरात लवकर पकडून जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावा व पीडित युवतीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.’’ यावेळी पुंडलिक दळवी, अॅड. सायली दुभाषी, दर्शना बाबर-देसाई आदी उपस्थित होते.