रत्ना जाहीरात

रत्ना जाहीरात

रत्नदूर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीचा
भूमीपूजन समारंभ आज

रत्नागिरी, ता.२३ : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नदूर्ग किल्ला येथे शिवसृष्टी साकार होत आहे. रत्नागिरी नगरपरिषद वैशिष्टपूर्ण विशेष अनुदान योजनेंतर्गत रत्नदूर्ग येथे शिवसृष्टी निर्माण करणे, या विकासकामाचा भूमीपूजन सोहळा रत्नदूर्ग किल्ला येथे उद्या (ता.२४) मे सायंकाळी ०६.०० वाजता राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, विशेष निमंत्रित सदस्य, सिंधूरत्न समृध्द योजना किरण सामंत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या सोहळयास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तुषार बाबर प्रशासक तथा मुख्यधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com