Sat, Sept 30, 2023

नवाबाग किनाऱ्यावर स्वच्छता
नवाबाग किनाऱ्यावर स्वच्छता
Published on : 24 May 2023, 12:23 pm
04647
वेंगुर्ले ः नवाबाग समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
नवाबाग किनाऱ्यावर स्वच्छता
वेंगुर्ले ः येथील नगर परिषदेमार्फत जी-२० अंतर्गत उभादांडा ग्रामपंचायत हद्दीतील नवाबाग समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सुटीचा दिवस असतानाही या स्वच्छता मोहिमेत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन किनाऱ्यावरील जवळपास ६५० किलो कचरा जमा केला. जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यावर देशभरात मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून समुद्रकिनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.