खेड-दहा वाड्यांची तहान भागवणारा आधुनिक भगिरथ

खेड-दहा वाड्यांची तहान भागवणारा आधुनिक भगिरथ

rat२४p२.jpg-
04651
खेडः चिंचघर -दस्तुरी येथील उद्योजक रमेश चव्हाण यांनी डोंगरभागात असलेल्या त्यांच्या जमिनीत खोल खड्ड्यात साठवलेले पावसाचे पाणी.
rat२४p३.jpg-
04652
उंच डोंगर माथ्यावर पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी.
rat२४p४.jpg-
04653
चिंचघर डाऊलवाडीसाठी उद्योजक चव्हाण यांनी दिलेली पाच हजार लिटरची पाणी साठवण टाकी.
----------------

कथा आधुनिक भगिरथाची भाग १...........लोगो

दहा वाड्यांची भागवतोय तहान
स्वखर्चांने घरोघरी पाणी; चार हजार ग्रामस्थांना दिलासा

इंट्रो

मे महिना अर्धा सरला असतानाच उन्हाच्या काहिलीने जीव मेटाकुटीस आला आहे. अशा या अतिउष्णतेमुळे दिवसेदिंवस भूजल पातळी खाली जात आहे. याबाबत शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असतानाच पदरमोड करीत चिंचघर-दस्तुरी येथील उद्योजक रमेश चव्हाण हे आधुनिक भगिरथ बनून चार हजार ग्रामस्थांची तहान भागवित आहेत. केवळ माणसासाठीच नव्हे तर या असह्य उकाड्यामध्ये जनावरांना देखील दिलासा मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या शेकडो एकर जागेत विविध ठिकाणी पाणवठे उभारले आहेत. अशा या आधुनिक भगीरथाच्या बहुआयामी कामांचा वेध घेणारी मालिका आजपासून....
- सिद्धेश परशेट्ये, खेड
----
खेड, ता. २३ः मार्च महिना लागला की डोंगर माथ्यावरील वाड्या वस्त्यामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाचे टॅंकर धावू लागतात. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पाणी योजना राबवूनही टॅंकरमुक्तीच्या घोषणा फोल ठरत आहेत. दिवसेंदिवस उन्हाळ्यात टॅंकरची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ शासकीय योजना राबवायची म्हणून कामे केली जातात. मात्र त्याचा उपयोग न होता अशा योजना निकामी ठरतात. अशा योजनांना कंटाळलेल्या ग्रामस्थांना उद्योजक रमेश चव्हाण हे स्वःखर्चांने गेली सहा वर्षे उन्हाळ्यातील चार महिने टॅंकरने पाणी पुरवठा करीत आहेत.
चोरद नदी पात्रातून टॅंकरने हा पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु यावर्षी मात्र मार्च महिन्याच्या सुरवातीलाच रमेश चव्हाण यांनी हा पाणीपुरवठा स्वतःच्या जागेतून करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी डोंगरावरील आपल्याच पडीक जागेत मोठा तलावासारखा खड्डा खणून त्यामध्ये पावसाचे पाणी साठवण्यासाठी खड्याच्या एका बाजूला पंचवीस फुट उंचीची आणि शंभर फुट लांबीची क्रॉक्रिटची भिंत उभारली. ही भिंत उभारण्यासाठी त्यांना खुप मोठी पदरमोड करावी लागली. परंतू केवळ सामाजिक भान ठेवत त्यांनी तहानलेल्याची तहान भागवण्यासाठी ही पदरमोड केली आहे. या खड्ड्यात गतवर्षींच्या पावसाळ्यात चांगला पाणीसाठा झाला. तेच पाणी पंपाच्या साह्याने यावर्षी त्यांनी बांधलेल्या सुमारे पावणे दोन लाख लिटरच्या टाकीत पंपाच्या साह्याने साठविण्यात आले. तेथून लगतच असलेल्या सुमारे दोन गावातील १० वाड्यांना सायफन पद्धतीच्या साह्याने नळ जोडण्या देण्यात आल्या. यासाठी ग्रामस्थांकडून एकही रुपया न घेता हा लाखो रुपयांचा खर्च चव्हाण यांनी स्वतः हा करावयाचे ठरविले. यासाठी त्यांची आई (कै.) भार्गिथी बाबू चव्हाण यांचे संस्कार उपयोगी पडल्याचे रमेश चव्हाण यांनी सांगितले. हे काम करताना त्यांनी पावसाचे साठवलेले पाणी उंच डोंगरात बांधलेल्या पावणे दोन लाख लिटरच्या टाकीत सोडले आहे. ही टाकी बांधण्यासाठी त्यांना सुमारे साडे सात लाखांचा खर्च आला आहे. त्या टाकीतून आजुबाजूच्या वाड्यावस्त्यावर सुमारे चार किमीची पाईपलाईन फिरवण्यात आली असून यामुळे दरवर्षी पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थांना चव्हाण यांनी उभारलेल्या या जलकुंभामधून पाणी पुरवठा होत आहे.

चौकट
बावाशेठ चव्हाण यांनी आम्हाला गेली सहा वर्षे टॅंकरने पाणी पुरवले आहे. सद्यस्थितीत आमच्या वाडीला आमच्या लगतच्या वाडीला पाण्याच्या टाक्या देऊन त्यांच्या जागेतून पाण्याची पाईपलाईन देऊन त्यांनी आमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविला आहे. अन्यथा आम्हाला गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
- अनंत डाऊल, ग्रामस्थ, चिंचघर मेटकरवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com