चिपळूण-लोटिस्मात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

चिपळूण-लोटिस्मात छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा

लोटिस्मात छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा
आगळावेगळा कार्यक्रम ; २ जूनला वाजणार सनई-चौघडे
चिपळूण, ता. २१ः परमवंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे होत आहेत. या निमित्त टिळक स्मारक वाचन मंदिरात आगळ्यावेगळ्या पद्धतीने राज्यभिषेक सोहळा होणार आहे. २ जूनला तिथीप्रमाणे राज्याभिषेक सोहळा होणार आहे. महाराजांचा राज्याभिषेक प्रातःकाळी झाला होता. लोटिम्माच्या सभागृहात सकाळी सहा वाजता सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. परिसरातील पवित्र नद्यांच्या जलाने महाराजांच्या प्रतिमेला मंगलस्नान होईल. त्यानंतर महाराज जगदीश्वराच्या म्हणजेच येथील गौतमेश्वराच्या दर्शनाला पालखीतून जातील. पालखीसोबत सनई चौघडा आणि मंगलवाद्ये तसेच मार्गावर केशराचे सडे घातले जातील. याप्रसंगी पुष्पवृष्टी होईल. पालखीसमोर सरीपटट्याचे चित्तथरारक खेळ होतील. शिवदर्शनानंतर महाराज ग्रामदेवतेचे कालभैरवाचे दर्शन घेऊन दरवारात येतील. पुरोहित महाराजांचा समंत्रक अभिषेक करतील. महाराज सिंहासनारूढ झाल्यानंतर चारण भाट महाराजांची स्तुतीस्तोत्रे गातील. दरवारात महाराजांसमोर नृत्यगायनादी कार्यक्रम झाल्यानंतर शहरातील प्रमुख देवस्थानांना मानाची वस्त्रे व श्रीफळ देण्यात येणार आहेत.
३५० वर्षापूर्वी श्रीक्षेत्र रायगडावर जसा उत्साहात राज्यभिषेक झाला, तसाच राज्याभिषेक सोहळा होणार असून या उत्सवात सर्वांनी पारंपरिक पोषाखात उपस्थित राहावे, असे आवाहन लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com