Thur, October 5, 2023

आचरा परिसरात गव्यांचा वावर
आचरा परिसरात गव्यांचा वावर
Published on : 24 May 2023, 12:41 pm
04672
आचरा ः येथील माळरानावर दृष्टीस पडलेला गवा.
आचरा परिसरात गव्यांचा वावर
आचरा : आचरा परिसरात गव्यांचा वावर वाढला असून आज सकाळी आचरा माळरानावर गवा फिरताना ग्रामस्थांच्या नजरेस पडला. सध्या या भागात काही ठिकाणी उन्हाळी भाजीपाला लागवड केली जात आहे. त्यातच गवा शिवारभर फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आहे. आचरा भागात दोन दिवसांपासून कारीवणे भागात काहींना दोन गवे फिरताना दिसले होते. आज नागोचीवाडी लगत आचरा माळरानावर राहणारे बाबू धुरी यांच्या नजरेस गवारेडा दिसून आला. या भागात काही ठिकाणी उन्हाळी भाजीपाला, पिकवीला जातो. मात्र, गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.