‘स्त्रीशक्ती’ शिबिराचा लाभ घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्त्रीशक्ती’ शिबिराचा लाभ घ्या
‘स्त्रीशक्ती’ शिबिराचा लाभ घ्या

‘स्त्रीशक्ती’ शिबिराचा लाभ घ्या

sakal_logo
By

04469
कुडाळ ः ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना आमदार वैभव नाईक. शेजारी प्रजित नायर, अमोल पाठक, विजय चव्हाण, मंदार शिरसाट आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘स्त्रीशक्ती’ शिबिराचा लाभ घ्या

आमदार वैभव नाईक; कुडाळात लाभार्थ्यांना योजनांची मंजुरी पत्रे

कुडाळ, ता. २४ ः शासनाचा प्रत्येक उपक्रम हा लोकांसाठीच असतो. या पार्श्वभूमीवर आज प्रत्येक योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळावा, यासाठी स्त्रीशक्ती समस्या शिबिर व ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात योजनांच्या लाभासाठी महिलांना संधी असून त्यांचा लाभ उठवा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी विविध विभागाच्या लाभार्थ्यांना योजनांच्या मंजुरीचे पत्र देण्यात आले.
कुडाळ तालुका प्रशासनाच्यावतीने महिला व बालकल्याण विभाग पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्त्रीशक्ती समस्या शिबिर व सशक्त नारी समुध्द भारत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल येथे आज झाला. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन, अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. संगम प्रभाग नेरूर महिलांच्या उमेद गीतानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी आमदार नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, महिला बालकल्याण अधिकारी श्रीमती पाटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. किंजवडेकर, तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर, नायब तहसीलदार उदय दाभोलकर, शामराव पेजेस विभागाचे निशिकांत नार्वेकर, श्रीनिधी देशपांडे, वनविभागाचे सु. प्र. सावंत, संजय गांधी निराधार योजना माजी अध्यक्ष अतुल बंगे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले, "या शिबिरातून महिला म्हणून तुमच्या हातात काय ताकद आहे, ते तुम्हाला समजेल. तहसीलमध्ये वारस तपास काम प्रलंबित असून ती वेळेवर व्हावीत. आजचा या स्तुत्य उपक्रमात सायंकाळी ५ पर्यंत अधिकारी म्हणून तुमचे काम आहे आणि ५ नंतर आमचे काम आहे. त्यामुळे याठिकाणी चांगल्या प्रकारे कामे व्हावीत."
सीईओ नायर म्हणाले, ‘‘आजच्या या शिबिरात ९५ टक्केपेक्षा अधिक महिलांची उपस्थिती आहे, ही समाधानकारक बाब आहे. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांना प्राधान्य देण्यात येत आहे. सर्व खात्यांना एकत्रित आणुन स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांकडे अधिक लक्ष दिला जाईल. तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमार्फत शासकीय योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा. त्यात काही त्रुटी असल्यास तक्रार नोंदवा, त्यांची वेळीच दखल घेतली जाईल.’’ यावेळी पॅक हाऊस, यांत्रिकिकरण, ठिंबक सिंचन, शेततळी स्किम, नगरपंचायत, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, आरोग्य विभाग, प्रधानमंत्री, मातुवंदना योजना, जननी सुरक्षा योजना, उमेद, एकात्मिक योजना, एमएससीआयटी, सायकल योजना, शिलाई मशीन योजना, तहसीलदार विभाग रेशनिंग कार्ड, पोस्ट ऑफिस आदी विविध विभागांच्यावतीने लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रफुल्ल वालावलकर यांनी निवेदन केले. तहसीलदार अमोल पाठक यांनी आभार मानले.
..............
चौकट
२७ विभागांचे स्टॉल
या शिबिरात नगरपंचायत, उमेद, महिला बालकल्याण विभाग, आरटीओ, शिक्षण, वनविभाग, आरोग्य, एसटी महामंडळ, समाज कल्याण, बचतगट, पोस्ट ऑफिस, शामराव पेजे आदी विविध योजनांचे स्टॉल तसेच विविध २७ विभागांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले. त्या स्टॉलवर महिलांना विविध योजनांबाबत माहिती दिली जात होती.