सावंतवा़डीतील विजेचा 
खेळखंडोबा थांबवा

सावंतवा़डीतील विजेचा खेळखंडोबा थांबवा

04556
सावंतवाडी : विद्युत अधिकाऱ्यांना जाब विचारताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.

सावंतवा़डीतील विजेचा
खेळखंडोबा थांबवा
राष्ट्रवादीची मागणी; अधिकारी धारेवर

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः अति उष्णता व लग्नसराईची खरेदी सुरू असताना शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात धडक देत उपअभियंता एस. एस. भुरे यांना जाब विचारला. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊ लागल्याने शहरातील सर्व व्यापारी वर्ग व नागरिक त्रस्त आहेत. जागतिक मंदीचे व्यवसायावर सावट असताना वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याचा परिणाम व्यवसायिकांवर होत असून हा तात्काळ थांबवा, अशी सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
मॉन्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून अद्यापही विद्युत वाहिन्यांवरील झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात आले. सावंतवाडी कोलगाव सबस्टेशनवरून येणाऱ्या विद्युत वाहिनीवर वाढलेली झाडी तोडण्याकरिता बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करावा, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुचविण्यात आले. त्यावर महावितरणच्या अभियंत्यांनी लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्यांशी निगडित सर्व कामे पूर्ण करून घेऊ. सावंतवाडी शहरात होणारा खंडित विद्युत पुरवठा सुरळीत ठेवू, अशी हमी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायत खान अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, सरचिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक सदस्य रज्जब खान आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com