कानसेंचे निसर्ग चित्र राष्ट्रीय स्पर्धेमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कानसेंचे निसर्ग चित्र
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये
कानसेंचे निसर्ग चित्र राष्ट्रीय स्पर्धेमध्ये

कानसेंचे निसर्ग चित्र राष्ट्रीय स्पर्धेमध्ये

sakal_logo
By

कानसेंचे निसर्ग चित्र
राष्ट्रीय स्पर्धेमध्ये
सावंतवाडी ः माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक सिद्धेश कानसे यांनी रेखाटलेल्या निसर्ग चित्राची राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि स्पर्धेसाठी निवड झाली. कलामहर्षी बाबुराव पेंटर आर्ट फाउंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि स्पर्धा पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात होणार आहे. या राष्ट्रीय कला प्रदर्शनात देशभरातील विविध कलावंतांच्या एकूण ५०० कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात २ ते ४ जूनपर्यंत सकाळी ८.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले असणार आहे. कानसे यांची राष्ट्रीय कला स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार, सचिव सीए लक्ष्मण नाईक, मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
--
रेल्वे गाड्यांना
अतिरिक्त डबे
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी काही गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. २२९०८ हापा ते मंडगाव आणि परतीच्या एक्स्प्रेस गाडीला एक स्लीपर डबा, गाडी क्र. २०९१० पोरबंदर ते कोचुवेली एक्स्प्रेस आणि परतीसाठी २८ मेस एक डबा, गाडी क्र. १२४३१ तिरुवनंतपुरम सेंट्रल ते निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस एक थ्री टायर एसी डबा जोडण्यात येणार आहे. गाडी क्र. १२४३२ निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल - राजधानी एक्स्प्रेससाठी जादा डबा आहे.
--
धोकादायक आम्रवृक्ष
हटविण्याची मागणी
सावंतवाडी ः शहरातील माठेवाडा काझी दिंडी येथील जुने आंब्याचे झाड वीज वाहिन्यांवर आल्याने धोकादायक बनले आहे. पावसाळ्यापूर्वी वाहिन्यांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडणे गरजेचे आहे. पावसाळ्यात हे झाड वाहिन्यांवर कोसळल्यास वितरणची मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे ते झाड हटविण्याची मागणी स्थानिकांसह वाहन चालकांतून होत आहे.
--
किशोरी पेडणेकरांची
ओसरगाव येथे भेट
कणकवली ः मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ओसरगाव येथील तलावाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी ओसरगावच्या मांडावर ग्रामदैवत लिंगमाउली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे दिनेश अपराज, गणेश अपराज आदी उपस्थित होते.