नंदकुमार पेडणेकर यांना ‘स्वामी रत्न’ पुरस्कार

नंदकुमार पेडणेकर यांना ‘स्वामी रत्न’ पुरस्कार

04686
नंदकुमार पेडणेकर

नंदकुमार पेडणेकर यांना
‘स्वामी रत्न’ पुरस्कार
देवगड, ता. २४ ः श्री स्वामी समर्थ भक्त परिवार संचलित तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक सचिव नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांना ‘स्वामी रत्न पुरस्कार २०२३’ घोषित झाला आहे. पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात मंगळवारी (ता.३०) अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश कल्याणराव इंगळे आणि चोळप्पा महाराजांचे वंशज अन्नू गुरुजी यांच्या हस्ते पेडणेकरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
समर्थनगरी आध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट या संस्थेने पेडणेकर यांच्या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय ‘स्वामी रत्न २०२३’ पुरस्कार घोषित केला आहे. जामसंडे खाकशी (ता.देवगड) येथील सुपुत्र असलेले पेडणेकर हे सद्यस्थितीत जोगेश्वरी (मुंबई) व देवगड या ठिकाणी सामाजिक, धार्मिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे. यापूर्वी कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेने त्यांना नववा राष्ट्रीय ‘अक्कलकोट भूषण’ हा पुरस्कार २०२२ मध्ये अक्कलकोट येथे प्रदान केला होता. आता त्यांना ‘स्वामी रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे श्री स्वामी समर्थ भक्त मंडळी व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com