धनश्री निघाली अमेरिकेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनश्री निघाली अमेरिकेला
धनश्री निघाली अमेरिकेला

धनश्री निघाली अमेरिकेला

sakal_logo
By

rat२४p१२.jpg-
M०४७०५
दापोलीः अमेरिकेला जाणाऱ्या धनश्रीचा सत्कार करताना केंद्रप्रमुख संतोष आयरे.
-----------------
धनश्री निघाली अमेरिकेला
गावतळेः दापोली तालुक्यातील शिरसोली जिल्हा परिषद शाळेतील धनश्री जाधव हिची नासा अमेरिकेसाठी निवड झाल्यापासून अनेकांनी तिचा सत्कार करुन अभिनंदन केले. अमेरिकेला जाण्यापूर्वी मार्गदर्शक शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांनी सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन मायलेकींचा गौरव केला आणि शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक मजीद नांदगावकर यांनी तयार केलेले सन्मानपत्र वाचन करत, धनश्री निघाली अमेरिकेला, शुभेच्छा शाळेच्या लेकीला असे भावोद्गार काढले. याप्रसंगी केंद्रप्रमुख संतोष आयरे, शिक्षक संदीप भेकत आदी उपस्थित होते.
-------
rat२४p१३.jpg
M०४७०६
दापोलीः सोमजाई सेवा मंडळातर्फे नितीन गुहागरकर यांचा सत्कार करताना सरपंच दीप्ती रसाळ.
----------
असोंडतर्फे शिक्षक गुहागरकरांचा सत्कार
गावतळेः दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा असोंडला शिष्यवृत्ती परीक्षेत सलग तीन वर्षे गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देणारे, कला, क्रिडा, शैक्षणिक कार्यात नेहमीच हिरीरीने भाग घेणारे शिक्षक नितीन गुहागरकर यांची देगाव येथे बदली झाली. असोंड शाळेत १६ वर्षे ११ महिने ३ दिवस सेवा दिली. त्यांचा सोमजाई सेवा मंडळ असोंड यांच्यातर्फे सरपंच दीप्ती रसाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी दादा इदाते, दशरथ पाटील भरत दाभोळकर, गणेश देवघरकर ,चंद्रकात पड्याळ, भरत रसाळ आदी उपस्थित होते.
------
कंपनीने कामगारांवर अन्याय करू नये
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी जे. के. फाईल्स कंपनीच्या कामगारांच्या अनेक समस्या होत्या. त्या अडचणींसंदर्भात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यावेळी कामगार आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी कामगारांच्या समस्या ऐकून कागराच्या हितासाठी मी कामगारांबरोबर आहे असा शब्द दिला आहे. कंपनीने स्थानिक कामगारांवर अन्याय करू नये असा सल्ला ही दिला आहे.
----------------
rat२४p७.jpg
04740
रत्नागिरीः अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करताना उद्योगमंत्री उदय सामंत.
------------
उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते
होळकर पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आरोग्य विभाग जि. प. रत्नागिरी पुरस्कार वितरण व जिल्हास्तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण २०१३-१४ ते २०१८-१९ कै. शामराव पेजे सभागृहात झाले. जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार, श्री. यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये आदी उपस्थित होते.
----------