चिपळुणात आज पर्यटन चर्चासत्र

चिपळुणात आज पर्यटन चर्चासत्र

चिपळुणात आज
पर्यटन चर्चासत्र
चिपळूण, ता. २४ः शहर व तालुका परिसर सह्याद्री पर्वताच्या रांगा व वाशिष्ठी नदी- खाडी यांच्या निसर्ग संपन्न सान्निध्यात वसला आहे. येथे विपुल प्रमाणात निसर्ग जैवविविधता उपलब्ध असून भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा असा हा भाग आहे. उपलब्ध साधनसंपत्ती सामग्रीवर आधारित प्रवास पर्यटन, आदरातिथ्य या क्षेत्रामध्ये व त्या पूरक व्यवसायाच्या रोजगाराच्या अनेक संधी आहेत. याच अनुषंगाने ॲक्टीव्ह ग्रुप चिपळूणतर्फे गुरुवारी (ता. २५) सायंकाळी ५ ते ७ दरम्यान शहरातील स्वा. सावरकर सभागृहात चिपळूण तालुका पर्यटन विकास चर्चासत्र आयोजित केले आहे.
चर्चासत्राचे स्वरूप कार्यशाळेसारखे राहील. कार्यक्रमादरम्यान चिपळूण शहर परिसरसह तालुक्याचा पर्यटनात्मक विकास व त्या पुरक उद्योग व्यवसाय रोजगार आदीबाबत विचारमंथन होईल. पर्यावरणप्रेमी व उद्योजक रामशेठ रेडीज, डॉ. मीनल ओक, राजेश्री कीर, धीरज वाटेकर, मंगेश गोवेकर, प्रज्ञा जोगळेकर, राजेश जोष्टे आदींचे मार्गदर्शन तसेच अनुभव कथन करणार आहेत. प्रवास, पर्यटन, आदरातिथ्य या क्षेत्रातील व त्यापूरक इतर क्षेत्रातील व्यक्ती-संस्थांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲक्टीव्ह ग्रुप चिपळूणतर्फे केले आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी कैसर देसाई, समीर कोवळे, प्रकाश काणे, मिलिंद कापडी, विलास महाडिक, श्रद्धा चितळे यांच्याशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com