दाभोळ-ओणनवसेत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा बळी

दाभोळ-ओणनवसेत बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा बळी

ओणनवसेत बिबट्याच्या
हल्ल्यात वासराचा बळी
दाभोळ, ता. २४ : दापोली तालुक्यातील ओणनवसेत बिबट्याची दहशत वाढली आहे. एका शेतकऱ्याने नेहमीप्रमाणे आपल्या गोठ्याबाहेर सायंकाळच्या सुमारास बांधून ठेवलेल्या वासरावर बिबटयाने हल्ला करून या वासराला ठार मारल्याने ओणनवसे गावासह परिसरात बिबटयाच्या संचाराने दहशतीच्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओणनवसे येथील हकिम ममतुले यांनी गोठ्याबाहेर बांधून ठेवलेल्या एका गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासराला ठार मारले. ही घटना २२ मे रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती ममतुले यांनी वनविभागाचे अधिकाऱ्यांना दिली. मात्र कालपर्यंत वन विभागाचे कर्मचारी पंचनाम्यासाठी फिरकलेच नाहीत. पंचनामा झाला नाहीतर नुकसान भरपाई मिळणार नाही. मग याला जबाबदार कोण अशाप्रकारचा संतप्त सवाल ओणनवसे गावातील ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
वन विभागाचे अधिकारी वृक्ष आणि जंगलतोडीला मुक्त परवानगी देत असल्याने वन्य जीवांचा अधिवासाचा प्रश्न निर्माण तर झालाच आहेच. शिवाय त्यांना खाद्यही मिळत नसल्याने बिबट्यासारखे प्राणी हे भक्ष्याच्या शोर्धात मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. असाच प्रकार हा ओणनवसे येथे घडला असून हकिम ममतुले यांचा वासरावर हल्ला करत बिबट्याने वासराला ठार मारले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com