इन्फिगो आय केअरमध्ये 2 लाख नेत्रतपासणी

इन्फिगो आय केअरमध्ये 2 लाख नेत्रतपासणी

३३ (पान २ साठी)

इन्फिगो आय केअरमध्ये
दोन लाख नेत्रतपासणी

डॉ. कामत २६ पासून रत्नागिरीत ; पूर्वनोंदणी आवश्यक

रत्नागिरी, ता. २४ : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये गेल्या अडीच वर्षांत तब्बल २ लाख नेत्र तपासणी करण्यात आली. ११०० हून अधिक अवघड, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या. डायबेटीस असणाऱ्या ५० हजारांहून अधिक रुग्णांच्या पडद्याची तपासणी करण्यात आली. दरमहा रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत रुग्ण तपासणी करतात. या महिन्यात २६ ते २८ मे दरम्यान डॉ. कामत रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रिया करणार आहेत. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत तपासणी होणार असून याकरिता पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये साळवी स्टॉप येथे इन्फिगो आय केअर सुरू झाले. डोळ्यांविषयी सर्व काही असे ब्रीदवाक्य अडीच वर्षे जपले आहे. येथे मधुमेह असणाऱ्यांमध्ये जागृती व्हावी व मधुमेहाचा डोळ्यांवर व पडद्यावर होणारा परिणाम वेळीच समजावा याकरिता शिबिरे घेतली. यात मंडणगड, संगमेश्वर आणि चिपळूणमध्ये प्रत्येकी ४, खेड १०, देवरुख ६, साखरपा, जैतापूर आणि नाटेत प्रत्येकी २, राजापूर १०, रत्नागिरीत सर्वाधिक १०८ रेटिना तज्ज्ञांची शिबिरे घेण्यात आली. पडद्याचे गंभीर आजार आहेत व त्यामुळे दृष्टीनाश झालेल्या १४२ जणांना नवीन दृष्टी प्राप्त झाली.
रक्तातील अनियंत्रित साखर डोळ्यांवर परिणाम करते. दृष्टी पटल किंवा रेटीनाला सूज येते, पडद्यावरती रक्तस्त्राव होतो, पडद्याला छिद्र पडते अशा समस्या येऊ शकतात. पण मधुमेही रुग्णांनी वर्षातून किमान दोनदा रेटीनातज्ज्ञांकडून तपासणी करून घेतल्यास पुढील धोका टाळता येईल. रेटिना तपासणी करण्याची व त्यावरील अवघड शस्त्रक्रियासुद्धा येथे केल्या जाणार आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अवघड रेटिना तपासणी केली जाणार आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वरच्या ग्रामीण व शहरी भागांतील जनतेने या सुविधाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.
---
अद्ययावत यंत्रणा
इन्फिगो हॉस्पिटलमध्ये ग्रीन लेझर, डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड ॲनालायझर, अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणा आहे. याद्वारे रेटीनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते. अत्याधुनिक अशा सूक्ष्म पद्धतीने केली जाणारी बिनटाक्याची व भूल न देता होणारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पडद्याच्या (रेटिना) सर्व शस्त्रक्रिया होणारे हे एकमेव रुग्णालय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com