परिस्थितीशी दोन हात करत
दयानंद यांनी मारली बाजी

परिस्थितीशी दोन हात करत दयानंद यांनी मारली बाजी

04721
दयानंद तेंडोलकर

परिस्थितीशी दोन हात करत
दयानंद यांनी मारली बाजी

तेंडोलीचे सुपुत्र; युपीएससीत ९०२ वी रँक

सावंतवाडी, ता. २४ ः सिंधुदुर्गातील आणखी एका सुपुत्राने युपीएससी परिक्षेत बाजी मारली आहे. तेंडोली (ता.कुडाळ) येथील दयानंद रमाकांत तेंडोलकर यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत युपीएससीमध्ये ९०२ रँक मिळवली. विशेष म्हणजे शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी हे यश मिळविले.
दयानंद यांचे वडिल गिरणी कामगार. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. हुशार असलेल्या दयानंद यांनी या परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले. सांताक्रुझजच्या बीएएमसी स्कूलमधून मराठी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर विलेपार्लेच्या साठे कॉलेजमधून पदवी घेतली. पुढे पहिल्याच प्रयत्नात ते सीए झाले. शिक्षण येथेच न थांबवता सीएस, एलएलबी अशा पदव्याही मिळवल्या. त्यांनी शिपिंग कार्पोरेशनमध्ये असिस्टंट मॅनेजरची नोकरी मिळाली. नोकरी करत असतानाच त्यांनी युपीएससीचा अभ्यास सुरू केला. नोकरी, संसार सांभाळत त्यांनी युपीएससीत यश मिळवले आहे. त्यांचा प्रवास अनेकांसाठी दिशादर्शक ठरेल असा आहे. याआधी दाभोली येथील वसंत दाभोलकर, नांदोस येथील तुषार पवार यांनी या परीक्षेत भरीव यश मिळवले. दयानंद यांच्या रुपाने आणखी एका सिंधुपुत्राची यात भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com