कचरामुक्त गावाचा नडगिवेत संकल्प

कचरामुक्त गावाचा नडगिवेत संकल्प

04727
नडगिवे : येथील ग्रामदैवत गांगेश्‍वर मंदिराच्या वर्धापन कार्यक्रमात पालखी नाचविण्याचा सोहळा रंगला. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)

कचरामुक्त गावाचा नडगिवेत संकल्प

गांगेश्वर मदिराचा वर्धापन दिन उत्साहात

खारेपाटण, ता.२४ : खारेपाटण लगतच्या नडगिवे गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर पावणा देवीचा दहावा वर्धापन दिन कार्यक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच पारंपरिक पद्धतीने पालखी नाचविण्यामध्येही अबालवृद्ध भाविकांनी उत्‍स्‍फूर्तपणे सहभाग घेतला.
ढोल - ताशांच्या गजरात वाजंत्री चौघड्याचा नादात हा कार्यक्रम झाला. यावेळी महिलांनीही ओट्या भरण्यासाठी मोठी उपस्थिती लावली होती. सकाळच्या सत्रात अभिषेक, महाआरती तर दुपारी महाप्रसाद, हळदीकुंकू, विद्यार्थांच्या गुण गौरवाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी स्थानिकांची भजने आणि त्‍यानंतर भजनांचा डबलबारी सामना रंगला.
या सोहळ्याला सरपंच माधवी मण्यार, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मण्यार, भास्कर राणे, अरविंद मण्यार, प्रमोद मुद्रस, दिलीप मण्यार, चंद्रकांत मण्यार, प्रकाश मुद्रस, अरविद्र आंबेकर, रुपेश हिवाळकर, किशोर मुद्रस, माजी सरपंच गजानन सावंत आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मुद्रस यांनी मंदिराचा वर्धापनाचे औचित्य साधून शून्य कचरा मोहीम राबविली. तसेच कचरा मुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com