संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

पान ५ साठी, संक्षिप्त

शिगवणवाडी, गोरीवलेवाडी
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
दाभोळ : दापोली तालुक्यातील नवशी येथे शिगवणवाडी व गोरीवलेवाडी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सभापती किशोर देसाई, तालुकाप्रमुख व नगरसेवक ऋषिकेश गुजर, माजी सभापती विश्वास कदम, महिला आघाडी उपसंघटिका मानसी विचारे, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहरप्रमुख दर्शन महाजन, समन्वयक सायली गावडे, विभागप्रमुख रवी घडवले, सहसचिव सतीश बाळगुढे, नवशी शाखेचे शाखाप्रमुख सागर जाधव, शाखाधिकारी अमोल कात्रे तसेच विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दापोली बसस्थानकातील
तो लोखंडी खांब हटवला
दाभोळ : दापोली बसस्थानकात असलेले जाहिरातींचे लोखंडी खांब मोडलेल्या स्थितीत लटकत असणारे खांब अखेर हटविण्यात आले आहेत. दापोली बस स्थानकात जाहिरात लावण्यासाठी असलेले लोखंडी खांबावर असलेले स्ट्रक्चर तुटले होते, त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका होता. याची दखल घेऊन एसटी प्रशासनाने हे जाहिरातींचे खांब हटवले आहेत. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दाभोळमार्गे फेरीबोटने
तेरा एसटी गाड्या रत्नागिरीत
दाभोळ : रत्नागिरी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. या संदर्भात दापोली येथे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीचे आयोजन केलं होते. या आढावा बैठकीत रत्नागिरी येथे जाण्यासाठी दापोलीतून ४२ एसटीच्या गाड्या २५ मे रोजी जाणार आहेत. त्यापैकी १३ गाड्या या दाभोळ फेरीबोटमार्गे जाणार आहेत. दाभोळ येथील फेरीबोटीतून एसटी बस नेण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे रत्नागिरी येथे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी फेरीबोटीतून परवानगी दिली जात असेल तर ही परवानगी कायमस्वरूपी देण्यात यावी अशी मागणी निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्यावर पालकमंत्री सामंत यांनी दाभोळ येथील फेरीबोटीतून कायमस्वरूपी एसटी बस नेण्यात यावी असे आदेश एसटीचे दापोली आगार व्यवस्थापकांना दिले आहेत. आता एसटी प्रशासनाने हा निर्णय घेवून कायमस्वरूपी एसटी सेवा रत्नागिरी येथे सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.