दाभिळ खाडीपट्टयात सक्शन पंपाव्दारे वाळू उपसा

दाभिळ खाडीपट्टयात सक्शन पंपाव्दारे वाळू उपसा

पान ५ साठी


दाभिळ खाडी पट्ट्यात
सक्शन पंपाद्वारे वाळू उपसा
दाभोळ, ता. २५ : दापोली तालुक्यातील दाभिळ खाडीपट्ट्यात सक्शन पंपाद्वारे राजरोसपणे वाळू उपसा सुरू असला तरी शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अवैध वाळू उपशाकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
वाळू उत्खननामुळे शासनाच्या तिजोरीत मोठी रक्कम जमा होते. दापोली तालुक्यातील उन्हवरे, पांगारी, दाभिळ आणि भोपण ही गावे तालुका मुख्यालयापासून दूर आणि दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. खाडीजवळ राहणाऱ्या एखाद्या नागरिकाने आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी अथवा शौचालयाच्या बांधकामासाठी नदीतील अथवा खाडीतील रेती बांधकामापुरती काढली तर हेच अधिकारी अव्वाच्या सव्वा दंड आकारून सर्वसामान्यांना त्रास देतात. अवैध वाळू उपशाने शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडीत जात असताना त्याकडे कानाडोळा करत आहेत.
या परिसरात सक्शन पंपाने बंदी असतानाही वाळूचा उपसा केला जात आहे. दररोज सायंकाळी दाभिळ खाडीत सक्शन पंपांची घरघर सुरू होते. एका ठिकाणी हातपाटी वाळू उपशाची परवानगी घेण्यात आली आहे. अशा ठिकाणी सक्शन पंपाने वाळू उपसा केला जात असून जेसीबीच्या साह्याने वाळू उपसली जात आहे. सक्शन पंपाने वाळू उपसा सुरू असतानाही महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष का करतात असा सवाल येथील नागरिक विचारात आहेत.
---

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com