बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश
बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

sakal_logo
By

३७ (पान ५ साठी)

-rat२४p१८.jpg-
२३M०४७३८
रत्नागिरी ः बोंडे-नरसिंग ग्रुपग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पालकमंत्री उदय सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
---

बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह
सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

रत्नागिरी, ता. २५ : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोंडे- नारशिंगेचे विद्यमान सरपंच गणेश कांबळे, महेश देसाई आणि इतर सदस्य यांनी गाव पॅनेलला जयमहाराष्ट्र करत बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
ग्रामपंचायत हद्दीतील लोकांचा विकास व्हावा, गावाची प्रगती व्हावी, हा मुख्य उद्देश आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे सांगितले. सरपंच गणेश कांबळे, उपसरपंच महेश देसाई, सदस्य मनोहर पानगले, साक्षी कुळे, शुभांगी कांबळे, अस्मिता शितप, मैथली पांचाळ यांनी जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, रवींद्र कांबळे, प्रवीण पांचाळ, मिलिंद खानविलकर, हरिश्चंद्र बंडबे आदी उपस्थित होते.