Ratnagiri News : बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri News : बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश

Ratnagiri News : बोंडे-नरसिंगेच्या सरपंचासह सदस्यांचा शिंदे गटात उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

रत्नागिरी : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोंडे- नारशिंगेचे विद्यमान सरपंच गणेश कांबळे, महेश देसाई आणि इतर सदस्य यांनी गाव पॅनेलला जयमहाराष्ट्र करत बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

ग्रामपंचायत हद्दीतील लोकांचा विकास व्हावा, गावाची प्रगती व्हावी, हा मुख्य उद्देश आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे सांगितले. सरपंच गणेश कांबळे, उपसरपंच महेश देसाई, सदस्य मनोहर पानगले,

साक्षी कुळे, शुभांगी कांबळे, अस्मिता शितप, मैथली पांचाळ यांनी जाहीर प्रवेश केला आहे. या वेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, रवींद्र कांबळे, प्रवीण पांचाळ, मिलिंद खानविलकर, हरिश्चंद्र बंडबे आदी उपस्थित होते.