
क्राईम पट्टा
चांदेराईत जुगारावर कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील चांदेराई नदीकिनारी असलेल्या झाडाखाली अवैद्य मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह २९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संतोष विश्वनाथ सुर्वे असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. २३) दुपारी निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.
--------
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील मुरुगवाडा येथे मासेमारी बोटीवर काम करणारा कामगार सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना सापडला. संशयित कामगाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अब्दूल हमीद अल्ली बुड्डू असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी (ता. २२) रात्री निदर्शनास आला. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
-------
मद्यविक्री करणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील ओरी-देणवाडी येथे मद्य विक्री करणाऱ्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश नावजी कदम असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. २३) दुपारी ओरी देणवाडी येथील माघारणीचा आंबा येथे काटेरी झाडीझुडपात निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत संशयित अवैद्य गावठी हातभट्टीची दारु विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.