रत्नागिरी-टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर
रत्नागिरी-टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

रत्नागिरी-टेम्पो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

sakal_logo
By

rat२४p२०.jpg-
04743
शुभम पालये
------------
टेम्पो-दुचाकी अपघातात
एक ठार, एक गंभीर
पानवल येथील घटना ; दुचाकी कठड्याला धडकली
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ः रत्नागिरी ते हातखंबा रस्त्यावर पानवल फाटा येथे टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. दुचाकीच्या मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्याचा प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
शुभम सुनील पालये (वय २३, रा. कापडगांव, फणसवठार, रत्नागिरी) असे अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास पानवल फाटा येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार शुभम पालये व ऋतिक संजय कुरतडकर (वय २५, रा. कापडगाव, रत्नागिरी) हे दोघे कंपनीतून सुटल्यानंतर दुचाकीवरून (एमएच-०८-ए-२७६२) जे. के. फाईल्स ते कापडगाव असे निघाले होते. यावेळी टेम्पो चालक सिद्धेश निलकंठ निमकर (वय २८, रा. बहादूरशेख नाका, चिपळूण) हे कुरिअर घेऊन हातखंबा ते रत्नागिरी येत होते. पानवल फाटा येथे निमकर यांचा टेम्पो (एमएच-१२-टीव्ही-५१८६) रस्त्याच्या साईडपट्टीत फसला. तो बाहेर काढत असताना अचानक टेम्पोचे स्टेअरिंग वळले आणि टेम्पो दुचाकीवर जाऊन आदळला.
धडक बसल्यानंतर दुचाकी कठड्याला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार शुभम याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला ऋतिक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ग्रामीण पोलिसात माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी झाले होते. शुभम व ऋतिक एकाच कंपनीत काम करतात. शुभमचा स्वभाव अतिशय मनमिळावू होतो. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईक व मित्रमंडळीने गर्दी केली होती.