रत्नागिरीत वाहतूक मार्गात बदल

रत्नागिरीत वाहतूक मार्गात बदल

१७ (पान ३ साठी)

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे
रत्नागिरीत वाहतूक मार्गात बदल

रत्नागिरी, ता. २३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासन आपल्या दारी या शासकीय उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी गुरुवारी (ता. २५) रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यानिमित्त मोठया प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, यांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे.
शहरातील आठवडा बाजार चौक ते काँगेस भवन नाका, काँग्रेस भवन ते मुरलीधर मंदिर, फडके उद्यान ते भुते नाका, असा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून भुते नाका ते ८० फुटी हायवे, सुभेदार चौक, पांढरा समुद्रमार्गे परटवणे गाडीतळ, अशा मार्गे वाहतूक वळविण्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या बदलेल्या पर्यायी वाहतूक मार्गाची वाहनधारकांनी नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या वाहतूक बंदी कालावधीतील वाहतूक नियमनाबाबत शहरवासीयांना माहिती मिळावी यादृष्टीने वाहतुकीची चिन्हे व फलक उभारण्याची कार्यवाही वाहतूक पोलिस विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com