गळफास घेऊन परिचारिकेची आत्महत्या

गळफास घेऊन परिचारिकेची आत्महत्या

१३ (पान ३ साठी)

गळफास घेऊन परिचारिकेची आत्महत्या

दोन दिवसापूर्वी स्नेहसंमेलनात वावर ; कारण अज्ञात


रत्नागिरी, ता. २४ ः शहरातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या नर्सने आरोग्य मंदिर येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हर्दिका नारायण मिरगुले (२२, रा. जैतापूर मिरगुलेवाडी, सध्या रा. आरोग्यमंदिर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
ही तरूणी शहरातील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून सेवेत होती. शिक्षण घेताना ती पार्ट टाइम जॉबही करीत होती. अन्य सहा मुली तिच्या समवेत आरोग्य मंदिर येथे भाड्याचा फ्लॅट घेऊन राहत होत्या. तीन मुली सुट्टी असल्याने आपल्या गावी गेल्या होत्या. हर्दिका व अन्य तीन मुली फ्लॅटमध्ये राहिला होत्या. कामावरून मंगळवारी सकाळी हर्दिका हॉस्पिटल मधून घरी जात असताना सहकारी तीन मुली हॉस्पिटलला जात होत्या. रस्त्यात त्यांची भेट झाली. सायंकाळी रुग्णालयात गेलेल्या तीन मुली पुन्हा फ्लॅटवर गेल्या. त्यावेळी फ्लॅट आतून बंद असल्याने त्यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी तिने पंख्याला गळफास लावल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळतच शहर पोलिस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. दोन दिवसापूर्वी रुग्णालयातील स्नेहसंमेलनात सक्रिय झालेल्या हर्दिकाने अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला हे समजू शकेल नाही. स्नेलसंमेलनातील फोटो तिने आपल्या आई वडिलांनाही पाठविले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com