आज शासनासह साक्षात मुख्यमंत्री रत्नागिरी दारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज शासनासह साक्षात मुख्यमंत्री रत्नागिरी दारी
आज शासनासह साक्षात मुख्यमंत्री रत्नागिरी दारी

आज शासनासह साक्षात मुख्यमंत्री रत्नागिरी दारी

sakal_logo
By

पान १ साठी

४७३९


शासनासह मुख्यमंत्री आज रत्नागिरी दारी
२५ हजार जणांना देणार लाभ; उद्योगमंत्री सामंतांचा पुढाकार
रत्नागिरी, ता. २४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (ता. २५) रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी योजनेंतर्गत तब्बल २५ हजार जणांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये योजनांचा लाभ दिला जाणार आहे. उपक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह उत्पादन शुल्कमंत्री शंभूराजे देसाई व अन्य दिग्गज उपस्थित राहणार आहेत. शिंदे गटाचे यानिमित्ताने पुन्हा एकदा रत्नागिरीत शक्तिप्रदर्शन होत आहे.
शासन आपल्या दारी, योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला लवकरात लवकर योजनांचा लाभ मिळावा, हे प्रमुख उद्दिष्ट सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार जणांपैकी ५२ हजार जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. २५ मे रोजी तब्बल २५ हजार जणांना लाभ दिला जाणार आहे. यावेळी विविध योजनांमधून तब्बल ४१ कोटी रुपयांचे वाटप लाभार्थ्यांना होणार असून, ५० कोटींचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी दहा वाजता रत्नागिरी विमानतळ आगमन होणार आहे. सव्वादहाला शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव वेळ आहे. साडेदहा वाजता पोलिस विभागाला दिलेल्या चारचाकी व दोनचाकी वाहने शासकीय तंत्रनिकेतन परिसरात सुपूर्द करण्यात येणार आहेत. सकाळी पावणेअकरा वाजता उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कौशल्य विकास या वास्तूचे लोकार्पण तेथेच करण्यात येणार आहे. सकाळी १०.५५ वाजता लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथील शासकीय विभागीय ग्रंथालय नूतनीकरण झालेल्या वास्तूचे लोकार्पण होणार आहे. सकाळी सव्वाअकरा वाजता प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील शासन आपल्या दारी, योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. पावणेदोन वाजता दिव्यांग व्यक्तींना तीनचाकी वाहन, कृषी यंत्र व कामगार किटचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. ३ वाजता विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.


मंडपाचे काटेकोर नियोजन
जिल्ह्यातून सुमारे २५ हजार लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपासून प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. आपले सरकार कार्यक्रमासाठी प्रमोद महाजन क्रीडांगणावर जिल्ह्यातून येणाऱ्‍या लोकांसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुपारचा उन्हाचा कडाका लक्षात घेता लोकांना त्रास होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, ओआरएसचा पाऊच दिला जाणार आहे. त्याचे योग्य पद्धतीने वितरण करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्‍यांवर सोपवली आहे. मैदानावर मोठा मंडप घातला असून, उष्मा जाणवू नये यासाठी कुलिंग फॅनची व्यवस्था केली आहे. सतर्क प्रशासनाने आरोग्य यंत्रणाही सज्ज ठेवली आहे.