माडखोल येथील अपघातात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माडखोल येथील अपघातात 
पशुवैद्यकीय अधिकारी जखमी
माडखोल येथील अपघातात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी

माडखोल येथील अपघातात पशुवैद्यकीय अधिकारी जखमी

sakal_logo
By

माडखोल येथील अपघातात
पशुवैद्यकीय अधिकारी जखमी
सावंतवाडी, ता. २४ ः माडखोल-धवडकी येथे मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात शहरातील भटवाडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत परब (वय ५५) हे जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी परब यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले.
डॉ. परब हे कामानिमित्त माडखोल येथे गेले होते. यावेळी समोरून येणाऱ्या इनोव्हा कार चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मोटार चालकाने घटनास्थळावरून पलायन केले; मात्र त्याला पोलिसांनी सावंतवाडीत ताब्यात घेतले. जखमी परब यांना माडखोल येथून स्वप्नील सावंत या सामाजिक कार्यकर्त्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविले. अपघाताची खबर मिळताच ‘सामाजिक बांधिलकी’चे कार्यकर्ते संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर, रवी जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेत त्यांना सर्वतोपरी मदत करून सुखरूप घरी सोडले. या अपघाताबाबत मोटार चालक आणि डॉ. परब यांच्यात तडजोड झाल्याने पोलिसांत गुन्हा नोंद झाला नाही.