झाडावरून पडल्याने
नाधवडेत एकाचा मृत्यू

झाडावरून पडल्याने नाधवडेत एकाचा मृत्यू

झाडावरून पडल्याने
नाधवडेत एकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २४ ः साळिस्ते-ताम्हणकरवाडी येथील संजय वामन ताम्हणकर (वय ४०) या तरुणाचा झाडावरून पडून मृत्यू झाला. हा प्रकार आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नाधवडे येथे झाला.
साळिस्ते येथील संजय ताम्हणकर, दिलीप ताम्हणकर आणि नाधवडे येथील अजिंक्य गुरव, सचिन गुरव हे चौघे झाडे तोडण्याचे काम करतात. गेल्या तीन-चार दिवसांपासून नाधवडे येथील महादेव पावसकर यांच्या घरानजीक ते झाडे तोडण्याचे काम करीत होते. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केली. संजय हे झाडावरील वाढलेल्या फांद्या तोडण्यासाठी चढत होते. वीस ते पंचवीस फुटावर असताना त्यांचा तोल गेल्याने ते झाडावरून कोसळले. यामध्ये त्यांच्या मानेला आणि कंबरेला मोठी दुखापत झाली. त्यांना तत्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले; परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. याबाबतची खबर दिलीप ताम्हणकर यांनी पोलिसांत दिली. अधिक तपास पोलिस हवालदार सुनील पडेलकर हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com