मारहाणप्रकरणी एडगावातील दोघा जणांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाणप्रकरणी एडगावातील
दोघा जणांवर गुन्हा दाखल
मारहाणप्रकरणी एडगावातील दोघा जणांवर गुन्हा दाखल

मारहाणप्रकरणी एडगावातील दोघा जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

मारहाणप्रकरणी एडगावातील
दोघा जणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २४ ः घरावर दगड फेकु नका, असे सांगण्यासाठी गेलेल्या एडगाव-रामेश्वरवाडी येथील शरयु सत्यशोधक रावराणे आणि इतर सदस्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. हा प्रकार मंगळवारी (ता.२३) रात्री साडेअकराच्या सुमारास झाला.
एडगाव-रामेश्वरवाडी येथे शरयु रावराणे यांचे घर आहे. पती सत्यशोधक आणि सासु इंदिरा राहतात. काल रात्री अचानक त्यांच्या घरावर दगड फेकल्याचा आवाज शरयु यांना ऐकु आला. सुरूवातीला काहीतरी पडले असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, सतत आवाज येऊ लागल्याने शरयु या घराबाहेर आल्या. त्यावेळी दिपक राजाराम रावराणे आणि त्यांचा मुलगा सन्मेष दिपक रावराणे हे दोघे घरावर दगड फेकत होते. त्यावेळी शरयु यांनी घरावर दगड फेकु नका, असे सांगीतल्याचा राग त्यांना आला. दोघेही अंगणातील दांडे घेऊन सत्यशोधक यांना मारण्यासाठी धावून गेले. त्यांना थांबविण्यासाठी शरयु गेल्या असता त्यांनाच दांड्याने मारहाण केली. आरडाओरडा ऐकुन बाहेर आलेल्या सासु इंदिरा यांच्या हातावर देखील दांडा मारला. दोघांनाही दुखापत झाली. या प्रकरणी शरयु यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.