सासोलीवासीयांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासोलीवासीयांचे उपोषण 
तिसऱ्या दिवशीही सुरूच
सासोलीवासीयांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

सासोलीवासीयांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच

sakal_logo
By

४७६८

सासोलीवासीयांचे उपोषण
तिसऱ्या दिवशीही सुरूच
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २४ ः सासोलीतील सामायिक जमिनीत केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास सासोली ग्रामपंचायत टाळाटाळ करत असल्याचा आरोप करीत तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोमवारी (ता. २२) सुरू केलेले आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
सासोली येथील सामायिक जमिनीचे अद्याप धडेवाटप झालेले नसताना देखील काहींनी या जमिनीतील काही अविभाज्य हिस्सा खरेदी केला असून यास ग्रामस्थांची कोणतीही संमती घेतली नाही. सासोलीतील ''त्या'' जमिनीत निश्चित क्षेत्र नसताना देखील दिलेल्या अकृषिक सनदीच्या आधारावर संबंधितांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या बांधकामावर प्रशासन कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सोमवारी सुरुवात केली. यावर अद्याप तोडगा न निघाल्याने उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू होते.