टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये कुणकेरी शाळेचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये
कुणकेरी शाळेचे यश
टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये कुणकेरी शाळेचे यश

टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये कुणकेरी शाळेचे यश

sakal_logo
By

04770
श्रुती सावंत, श्रेयस सावंत, रुची सावंत, दीक्षा सावंत

टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये
कुणकेरी शाळेचे यश
सावंतवाडी ः युवा संदेश प्रतिष्ठान, सांगवे आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकेरी नं. ३ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे दुसरी, तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील दुसरीतील दीक्षा सावंत (१२०), रुची सावंत (११२), तिसरीतील श्रेयस सावंत (१२४), श्रुती सावंत (१२०) या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक पटकावले. चौथीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विदयार्थ्यांना मुख्याध्यापक मिंगेल मान्येकर, वर्गशिक्षिका श्वेता देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा विनया सावंत, उपाध्यक्षा योगिता चव्हाण, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, सरपंच सोनिया सावंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---
04744
मुख्य प्रबंधकपदी दत्तात्रय सातवळेकर
देवगड ः उदगीर (जि. लातूर) येथे जिल्हा न्यायाधीश असलेल्या दत्तात्रय सातवळेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मुख्य प्रबंधक (न्यायिक) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच न्यायिक प्रशिक्षणाचे सहसंचालक ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते तालुक्यातील मणचे गावचे आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई, सांगली, लातूर या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले आहे. सध्या ते उदगीर येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.